यावे परतुनि शिवराया!
यावे परतुनि शिवराया!
सह्याद्रीच्या कडेकपारीत,
तळपली तलवार!
या परतुनि शिवराय,
कराया दुष्टांवरती वार।।१।।
सह्याद्रीच्या कडेकपारीत,
वीर मावळे गर्जले,
स्वराज्याचे सनई-चौघडे,
तोरणगडी वाजले।।२।।
राज्य स्थापन्या रयतेचे,
त्वेषात मराठे लढले,
वीर तानाजी, बाजी मावळे,
धारातीर्थी पडले।।3।।
सह्याद्रीची व्याघ्र गर्जना,
दिल्ली दरबारी दुमदुमली,
बलाढ्य ती मुघलशाही,
हैराण तुम्ही केली।।४।।
स्वराज्यावर चालून आला,
धिप्पाड अफजलखान,
दाखविले शिवराय तुम्ही,
त्याला कब्रिस्तान।।५।।
