माणसा, माणुस कधी होणार?
माणसा, माणुस कधी होणार?
माझ्या नयनातील आसवे,
तुझ्या नयनी कधी येणार,
माणसा रे माणसा तू,
माणूस कधी होणार।।१।।
माझ्या ओठातील गोड बोल,
तुझ्या ओठी कधी येणार,
माणसा रे माणसा तू,
माणूस कधी होणार।।२।।
माझा राम कधी, तुझ्या दर्ग्यात येणार,
माझा रहिम कधी, तुझ्या राऊळी येणार,
माणसा रे माणसा तू,
माणूस कधी होणार।।३।।
टाळ मृदंगाच्या तालावर,
रहिम कधी नाचणार,
कुराणातील सार सारे,
राम कधी वाचणार,
माणसा रे माणसा तू,
माणूस कधी होणार।।४।।
टोचता काटा मजला,
वेदना तुजला कधी होणार,
माझ्या वेदनेची कळ,
तुझ्या हृदयी कधी येणार,
माणसा रे माणसा तू,
माणूस कधी होणार।।५।।