STORYMIRROR

Mohiddin Nadaf

Others

3  

Mohiddin Nadaf

Others

काळ्या मेघांची झालर

काळ्या मेघांची झालर

1 min
11.7K

निळ्याशार अंबरी, काळ्या मेघांची झालर,

आल्या सरीवर सरी, नाचे थेंब भुमिवरी।। १।।


गोड कोकिळेची साद, डोलणार्या पानो-पानी,

गंध मातीचा आगळा, दरवळे रानो-रानी।। २।।


शुभ्र मोत्यांचा वर्षाव, चींब झाली पाखरं,

सुंदर त्या पंखावरी,आली नविन झालरं।। ३।।


वारा थबकुनि पाहे, टप-टप पानो-पानी,

पिंजारुनि हा पिसारा, नाचे मोर रानो-रानी।। ४।।


काळ्याभोर मातीतली, चिंब ओली पायवाट,

ल्याली हिरवा शालू, करी लटकाचं थाट।। ५।।


Rate this content
Log in