भारत मातेची आरती
भारत मातेची आरती
वंदितो हे मातृभूमी स्वर्गभूमी माता भारती ।
गातो तव आरती मी माते तुझाच रथ सारथी ।१।
जन्मभूमी असे तू माझी अन् कर्मभूमीही तूच ।
अर्पिण हे सर्व जीवन तन मन धन असे तुझेच ।२।
शेतकरी मी सैनिक मी उद्यमी असे मी कारागीर ।
पिकविल मी रक्षिल मी करतील कष्ट लहान थोर ।३।
ना थांबेल ना थकेल हा जीव तुझे अखंड सेवेसाठी ।
करील अनुदिन सेवा तुझी मी तुझेच कीर्तीसाठी ।४।
लाभले मज थोर भाग्य मी जन्मलो तुझे कुशीत ।
वाहीन हा देह तुझे कामी अन् मरेन तुझे मातीत।५।
<
strong>शूर वीर जन्मले येथे अन् साधू, संत, योगी, मुनीही ।
दिली शिकवण मानवतेची अन् रक्षिली ही भूमिही ।६।
माते तव वदन कश्मीर सुंदर चरण कन्याकुमारी ।
अरुणाचल, गुजर, मराठा बाहू तुझे थोर विस्तारी ।७।
ना झुकेल कधी मी माते शत्रू पुढे ना कधी वाकेल ।
करील रक्षण न भिता तुझे जोवर जिव हा असेल ।८।
ना उद्ध्वस्त होईल हा स्वर्ग हाणून पाडू शत्रूंचे बुरुज ।
सिंधु जलाने चरण धुवूनी फेडू माते तुझे हे कर्ज ।९।
उच नीच ना वर्ण द्वेष येथे ना राहील जाती पाती ।
एकच रामराज्य साकारू अखंड माता भारती ।१०।