मुलांचा अभ्यास
मुलांचा अभ्यास
अभ्यासाच्या बाबतीत
त्यांना जास्त धाक नका लावू।
हेच कर, म्हणून त्यांच्या मागे नका लागू।
शर्यतीच्या घोड्यासारखं
त्यांना नका पळवू।
हातचं सोडून पळत्याच्या
पाठीमागे नका लागू।
ज्यात डोकं चालत तेच
त्यांना त्यांच्या मनाने करू द्या ।
मन लावून मग करतील ते
त्यांचे स्वप्न पुरे होऊ द्या।
प्रत्येकात काहीतरी
लपलेला असतो कलागूण।
तीच एक असते ,
सुखी जीवनाची खूण।
अपेक्षांचं ओझं
त्यांच्या डोक्यावर नका ठेऊ।
हसत खेळत बालपण त्यांच
तुम्ही हिरावून नका घेऊ।
