STORYMIRROR

Prashant Kadam

Romance

3  

Prashant Kadam

Romance

भेट तूझी माझी !

भेट तूझी माझी !

1 min
5.5K


भेट तुझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी

अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी


खळखळून वहात होते, नदीचे ते पाणी

खळखळते हास्य तुझे, तसे भासले राणी

मंद स्मित होते ओठी, मोहकता त्या नयनी


भेट तुझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी

अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी


शांत स्तब्ध होता परिसर, जणू नंदनवना वाणी

तुझ्या माझ्या शिवाय नव्हते, दुसरे तिथे कोणी

दीर्घ श्वास पडत होते, आपले आपल्या कानी


भेट तुझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी

अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी


किलबिलतच होते पक्षी, ती प्रणयाची गोड वाणी

आपले शब्द अडले ओठी, सुरुवात करावी कोणी

धडधडत होती हृदये, काळजाच होत होते पाणी


भेट तुझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी

अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी


धुंद वारा होता सुटला, मेघ दाटले होते गगनी

अन अचानक चकाकली ती, विद्युलता गर्जूनी

अन् घाबरून बिलगली होतीस, मला तू राणी


भेट तुझी माझी होती, रम्य त्या ठिकाणी

अविस्मरणीय ठरली होती, आपली विराणी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance