तुला भेटण्याच्या आधी
तुला भेटण्याच्या आधी
एकटाच मी माझा होतो नव्हते माझे कुणीही
होती गोष्ट फार साधी, तुला भेटण्याच्या आधी ..||
बरे होते एका दृष्टीने तसे आजवरचे हे जिणे
बेफिकीर मस्त फिरस्ती मी, तुला भेटण्याच्या आधी ...||
लाविता तू दीप आशेचा उजळून गेला मन गाभारा
तसा ठोस अंधारच होता इथे, तुला भेटण्याच्या आधी
काय पाहिले तू माझ्यात, जे मला न जाणवले कधी
अनोळखी किती मीच मला, तुला भेटण्याच्या आधी ..||
माहिती नव्हते असते काय ते प्रेम, अन ती प्रीती ?
अवघड होते कोडे हे गोड, तुला भेटण्याच्या आधी ..||
-----------------------------------------------------------------------------------