अबोला तुझा
अबोला तुझा
तू न बोलता काही
मी ही अबोल होते
मन वेडे गोंधळलेले
अश्रुं वाटे रीते होते
मन ओलावते अश्रुंनी
विचार दाटता मनात
विचारांना मिळते रे
सहजच अश्रुंची वाट
अबोला तुझा सख्या रे
छळतो सदा मना रे
काहूर मनी तुझ्या रे
तु निशब्द असा का रे
सोड हा अबोला का रे
आर्त वेदना तुझ्या रे
साद घालती मला रे
राहू नको अबोल रे

