पहिला वाढदिवस
पहिला वाढदिवस
पहिल्या वाढदिवसाचा
असतो वेगळा थाट
गोडधोड पदार्थांनी
सजलेल चांदिच ताट
आई,आजी करतात औक्षण
उदंड आयुष्यासाठी प्रार्थना
सदा सुखी रहावेत
हीच असते मनोकामना
वाढदिवसाचा मस्त केक
हौशीने मुलं कापतात
हॅप्पी बर्थ डे टू यू
गाणे सगळे गातात
कुणी देतात चाॅकलेट
कुणी देतात छान खेळणी
गिफ्ट पॅक उघडून बघण्याची
लागलेली असते मुलांना घाई
