घननिळा श्रावण
घननिळा श्रावण
1 min
159
घननिळ्या श्रावणात
ऊन पावसाचा खेळ
सुखदुःखांचा घालावा
जणू आयुष्यात मेळ
आला श्रावण श्रावण
थेंबा थेंबात नाचत
सप्तरंगात न्हाऊन
पाचुची नक्षी काढत
प्राजक्ताच्या पायघड्या
चाफ्याचा घमघमाट
हिरव्या गालिच्यावर
त्या फुलराणीचा थाट
मंगळागौर पुजून
झिम्मा,फुगडि रंगते
माहेरच्या अंगणात
लेक आनंद पेरते
उपवास, पुजापाठ
व्रतवैकल्यांचा मास
सणवार, गोडधोड
आहे श्रावण खास.
