STORYMIRROR

Achala Dharap

Classics

3  

Achala Dharap

Classics

श्रावण सौंदर्य

श्रावण सौंदर्य

1 min
133

ऊन माळलं पावसाने थेंबात थेंबात

पाचू चमकले मग हिरव्या पानात पानात


आला श्रावण गवतावर नक्षी काढत काढत

रानफुले डोलू लागली रानात रानात


पारीजातक ओघळला गिरकी घेत घेत 

वा-यासंगे चालली बकुळ फुले उडत उडत 


गंध फुलांचा घेऊन कवेत कवेत

अवनी नटतेय हिरवा शालू नेसत नेसत


दवबिंदू आले नक्षी काढत काढत

हिरव्या शालुवर साज चढवत चढवत


ऊन पाऊस आला खो खो खेळत खेळत 

इंद्रधनुष्य आल सप्तरंग उधळत उधळत


गाणी गाती मुली पारंब्याना झोके घेत घेत

मंगळागौर जागवतात झिम्मा, फुगडी खेळत खेळत 


राखीचा रेशमी बंध बांधत बांधत

बहिण भावाच नातं जात रंगत रंगत


असा श्रावण येतो आयुष्यात रंग भरत भरत

साठवावे श्रावणाचे सौंदर्य मनात मनात


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics