श्रावण
श्रावण
श्रावण आला इंद्रधनुचा गोफ विणत
श्रावण आला पारिजातकाच्या पायघड्या घालत
श्रावण आला पंचपक्वान्नांची लयलूट करत
श्रावण बहरला पाचुच्या रानातून
श्रावण फुलला अनंताच्या पाकळ्यातून
श्रावण गंधाळला सोनचाफ्याच्या सुमनातून
श्रावण रंगला सुवासिनीच्या मेंदितून
श्रावण हासला अळवावरच्या थेंबातून
श्रावण खेळत आला निळ्या काळ्या मेघातून
श्रावण घुमला मंगळागौरीच्या खेळातून
श्रावण स्फुरला कवींच्या कवितेतून.
