श्रावणमास
श्रावणमास
1 min
159
ऊन माळत
खो खो खेळत
आला श्रावण
जणू हासत
थेंबा थेंबात
नाचत गात
श्रावणसरी
बरसतात
धरा सजली
वधू लाजली
हिरवा शालू
मस्त नेसली
पवित्र मास
महत्त्व खास
व्रतवैकल्ये
फुलांची रास
छान लुगडी
घालुन बुगडी
सजली लेक
खेळे फुगडी
सप्तरंगात
सजे शब्दात
श्रावण मास
कवी मनात.
