अस्तित्व
अस्तित्व
तुझ्या प्रीतीच्या वादळात
विझलेल्या दिव्याची वात आहे मी......
चन्द्र मिलनाचा झाकाळला जिथे
त्या चांदण रातीची कात आहे मी......
तुझ्या स्पर्शाला तरसलेल्या
अर्धवट मिलनाची बरसात आहे मी.....
गुलाल उधळला धरणीवर साऱ्या
तुझ्याशिवाय बेरंग झालेल्या अंबरात आहे मी...