पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
प्रेमापासून होतो दूर
वाटायची मला भीती
आपल्याला नाही जमणार
प्रयत्न जरी केलं किती
एक दिवस आला क्षण
पहिल्यांदा पाहिलं तिला
मनात वादळ उठलं
हृदय लागला धडकायला
तिला पाहताक्षणीच
पडलो तिच्या प्रेमात
त्याच दिवशी ठरवलं
तीच येईल जीवनात
वाटलं सांगावं तिला
पण कसं ते कळेना
तिला पाहिल्याविना
मला पण करमेना
ती नाही दिसली तर
दिवस वाया जायचा
तिच्या आठवणीनं
मन सुन्न व्हायचा
एक दिवस कळलं
तिने कॉलेज सोडल्याचं
ती दिसणार नाही मला
विश्वास नाही व्हायचं
वाटायचं मग मनाला
उगाच पडलो प्रेमात
राहायचं नव्हतं जवळ
तर का आली जीवनात
अस होत पहिलं प्रेम
व्यक्त करण्याधीच संपल
त्याची आशा का करायची
जे नव्हतं कधी आपलं

