भास
भास
भास
तुझ्या असण्याचा.
भास
तुझ्या मनसोक्त खळाळून हसण्याचा.
भास
तुझ्या पायातील पैंजणाचा, केसांत माळलेल्या मोगऱ्याचा.
भास
घरात तुझ्या वावराचा, कामात असताना मंजुळ गाणे गुणगुणण्याचा.
भास
तुझे भासच, नसे वास्तव, खेळ मांडला ज्यांनी माझ्या उभ्या आयुष्याचा.
भास.