Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Meenakshi Kilawat

Inspirational

5.0  

Meenakshi Kilawat

Inspirational

गझल

गझल

1 min
236


गजल   

     

कळी फुलवून चौफेरी, तुझ्या राज्यात आहे मी

झुले बघ बंध आयुष्या, जरा गंधात आहे मी


किती मुक्काम वादाशी, करावे लागता नडले

कशी आशा धरायाची, जरी स्वप्नात आहे मी


तुझा वाडा सुना होता,गरज होती भरवला तू

दयेचा अर्ज का फेटाळला ताब्यात आहे मी


सुखाला शोधण्यासाठी , पुजा आराधना केली

नवस केला पहाटेला, तुझ्या भाग्यात आहे मी


करी बेचैन मजला सांजवेळी गारवा सजणा

तुझा संदेश येण्याला उभी दारात आहे मी


कधीही अंतरी शांती, दिसाया लागता कळते

कधी आलीच नाही ती, घडी रागात आहे मी


 किती राबून चटके सोसले मी या गरीबीचे

मला ना आसरा तुझिया,दिल्या शापात आहे मी


जरी सोडून आले मी उगा माहेर नात्याचे

अडकते रोजही त्यांच्या जरी स्मरणात आहे मी


तुझ्या दुनियेत नाही मी,कुठेही तू वजा आहे

परंतू खोल दडलेल्या तुझ्या स्वार्थात आहे मी....


भरारी उंच घेशिल ही कदाचित तू मयूरावर

कुठेही आधि राधा माधवा ध्यानात आहे मी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational