शिमग्याची धुळवड
शिमग्याची धुळवड
फाल्गुनातला गारवा
शिमग्याला भरूया
अंगअंग भिजवूनी
आनंदाने खेळूया..
शिमग्याला भरतो रंग दरबार सदाबहार
प्रेमरंग उधळूनी राया अंगअग भिजवूया...॥धृ॥
हे सुंदर सप्तरंग
असतो प्रीतीचा संग
कसा फुलला शिशीर
जादू केली मनावर...
करू नको राया खोड्या मारू नकोस बोंबा...
प्रेमरंग उधळूनी राया अंगअग भिजवूया.॥१॥
फिरते मागे तुझ्या संगे
करू नको असा सोंगे
तुझ्यावर सम्मोहित
तुच माझा मनमीत...
दु:ख सारेच विसरूनी राधा कृष्णा वाणी रंगूया
प्रेमरंग उधळूनी राया अंगअग .॥२॥
आला ऋतू हा वसंत
अंतरंग खुलवित
मद्यधूंद पुणवेची
सदाबहार ही रात
नवउम्मेदीने रंगाची धूरवड खेळू जोडीन
प्रेमरंग उधळूनी राया अंगअग भिजवू या॥३॥
