STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

रंगाचे भरती थवे

रंगाचे भरती थवे

1 min
490

नवरंग असे विविध रूपात

अशी नजर हवी बघणाऱ्यात,

पृथ्वीवर सुर्य उधळतो रंग नवे

निसर्गात रंगाचे भरती थवे....


कुुमूदिनी नवउल्हास नवा

निसर्गाच्या अंगाअंगात नवरंग,

नवरंग पाखरू पंख पसारी

उत्साही मनी गगन भरारी....


रंग इंद्रधनुचे लावन्य मोहक

हिरवळ भरे ओली दवबिंदू,

जलाशय सागर झरे ओहळे

करी मंथन सागर सिंधू....


मंजुळ कुंजन करी पाखरे

वेचुन आला पाला

थव्याथव्यांने घेई भरारी

अरुणोदयी भरते लाली....


आकाशी या इंद्रधनूच्या

 छटा विहंगी सारे

प्रीयात रमे रंगात भरे

व्याकुळ नवथर पाखरे..


Rate this content
Log in