STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

आल्हाद हृदयातून

आल्हाद हृदयातून

1 min
344

जगले अशी माझ्यात मी

शिकले कुठे संकल्पुनी

आसावली भ्रमात या 

स्वप्नपुर्ती हिसकावूनी ...


दु:खाविले कोणी किती

पाण्यातल्या कमळासही

सुखाचे कोठे पाहतो तो

 सार स्वप्न जगण्यातही...


बांधायचा कसा कुणी

स्वप्नात तो ताजमहाल 

अंदाज धनाचा घेवूनी

त्याग करूनी हो भली...


माया तिच्या मनाची

नाही कुणा कळणारी

कोणास हे वरदान मग 

तू शोध घे आता तरी....

 

काटेरी फुले वेचिली 

रानावना भटकूनी जरी

साकारायला ही स्वप्ने 

जाणे वणव्यातुनी खरी....


गरीबी असे नशिबाने

प्रयत्न करणे हाती असे

प्रेमातल्या नांदा घरट्यात 

 संगतीला संसार वसे....


दुनियेतली घुसमट कशी 

साहेल का आता तरी 

भयमूक्त झाली पाहिजे

 नारी तू आता तरी...


झोपेतूनी स्वप्नातूनी

मग जाग जरा आता तरी

कर्तव्य करूनी या जगी 

सुख येतसे माघारी...


चीत्तातुनी हाकारुनी

आल्हाद ह्रदयातून या

गाण्यास गाता लीन हो 

मस्तपैकी मनमंदिरात या..


साहित्याला गुण द्या
लॉग इन