STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Others

4  

Meenakshi Kilawat

Others

गुढी पाडवा

गुढी पाडवा

1 min
444

गुढी पाडवा..नवीन वर्षातील

हिंदूंचा हा पहिला सण मात्र करा

कृपया खरेदीसाठी बाहेर पडू नका

आपल्या ह्रदयातल्या देवालाच स्मरा..

गुढी उभारुया साधेपणाची

गुढी उभारुया आरोग्याची

गुढी उभारु या संरक्षणाची

जाणीव असू द्या संकटाची...

एक वर्ष आपण जगू आपल्यासाठी

वेळ देऊ पुर्ण आपल्या परिवारासाठी

शुभेच्छा देऊया आप्तेष्ठ व मित्रांना

फोन,वाट्सअपवर, जीवन जगन्यासाठी...

बाजारात गर्दी करू नका

कोरोनाला घरी आणू नका

शर्दी खोकला ताप आल्यास

बिमारीला लपऊ नका...

मीरेजीरे,चिंचगुळ, हिंग, सुुंठ कुडुनिंब

घ्यावा वैदिक बलसौष्ठव प्रसाद

उभारू चैतन्यदायक गुढी आज

पळउन लाऊया कोरोनाची साद..

माणुसकीला ओळख देण्या

वेळीच करावे जनजागरण

गरजू लोकांची घेवूनी दखल

स्वच्छता, सुविचारला करू सक्षम


Rate this content
Log in