महामारी
महामारी
आली बघा महामारी तुम्ही घ्या की हो खबरदारी
स्वार्थात आंधळे होऊ नका लपऊ नका बिमारी..
असु द्या कर्तव्य भान
करू नका गलथान
करा सावध सर्वांना
त्यांची मदत कराना
शर्दी खोकला ताप आल्यास घ्या की हो जवाबदारी
स्वार्थात आंधळे होऊ नका लपऊ नका बिमारी..
ज्यांनी मनी न धरले
या रोगाने पछाडले
स्व:सोबत दुसऱ्याला
बिमारीने या ग्रासले
विश्व आले मेट्याकुटिला ऐका विद्वानांचे म्हणने
स्वार्थात आंधळे होऊ नका लपऊ नका बिमारी..
घर आंगन स्वच्छता
होई कोरोना लापता
खाणपाण ताजे अन्न
करू नका मन सुन्न
घ्यावी काळजी स्वत:ची अन् आपल्या कुटूंबाची
स्वार्थात आंधळे होऊ नका लपऊ नका बिमारी..
आज देऊ प्रतिसाद
देऊ कर्फ्यूला साद
प्रशासना देऊ हात
आपण करूया मात
पळवून लावूया आपण कोरोनाची महामारी
स्वार्थात आंधळे होऊ नका लपऊ नका बिमारी