काळजात लाॅकडाऊन
काळजात लाॅकडाऊन
1 min
470
अहो राया जाऊ नका बाहेर, होईल तुम्हास्नी फाईन
प्रितीची आहे शपथ करते काळजात लाॅकडाऊन॥धृ॥
ऐकाना माझी इनती
वाढतोय धोका किती
महामारी जीवघेणी
हा कोरोना आहे खूणी..
जीव माझिया तळमळतो भितीने जातोया घाबरून
प्रितीची आहे शपथ करते काळजात लाॅकडाऊन॥१॥
कुटुंबाचा हा विचार
आणू नका बाजार
खाऊ चटनी भाकर
असे जीवन साचार...
