मीडियावरील अफवा आणि परिणाम
मीडियावरील अफवा आणि परिणाम


सोशल मीडिया हे आपले विचार लोकांपर्यंत पोहचविण्याचे प्रभावी माध्यम आहे.मीडिया केंव्हाही कुठेही प्रगट होते.ती आपल्या जीवाची देखिल पर्वा करीत नाही. सारखी नविन माहिती त्यांच्यापासून लोकांना मिळत असते.वेळप्रसंगी ती प्रहार करायलाही भित नाही त्यांची नजर चहूकडे असते.सोशल मीडिया रानावनात , दुर्मिळ ठिकानी जावून माहिती गोळा करून आणतात .कोरोना संबतीतही त्यांनीच समाजाला खूप काही माहिती दिली आहे. रोजचे नविन आकडे घरी बसल्या कळत असते.सोशल मीडियाचे जेवढे कौतूक करावे तेवढे कमीच आहे अस मला वाटते.
पंरतू कधीकधी सोशल मीडिया जीवनाचा खेळ मांडून जाते,सर्व सिमारेषा ओलांडून आपले विचार दुसऱ्यावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात.कोणतीही छोटीमोठी गोष्ट खुप मोठी करून सांगतात. त्यांना इतका वेळ नसतो की खरे काय खोटे काय त्याची शहानिशा करावी. हेतू जरी वाईट नसला तरी समाजात त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. सोशल मीडियाच्या या अफलातून घटना ऐकून जन तासंतास टिव्हीसमोर बसून चिंता करून स्वास्थ्य मात्र घालवतांना दिसतात. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. कारण कोरोना जागतिक साथीचा रोग म्हणून प्रसिध्दीस आला आहे .त्यामुळे प्रत्येकजन धास्तावलेल्या स्थितीत आहे.त्यात भर म्हणुन शहानिशा न करता अफवा व्हायरल करतात.बऱ्याच चॅनलवर संधीसाधू आपला फायदा करून घेतात. अपुर्ण व चुकीची माहिती देऊन आपला प्रचार प्रसार करतांना दिसतात.सोशल मीडियाने काही गोष्टीत तर कहरच केलाय.कुणाची तमाच नाही वयक्तीक माहीतीपण सार्वजनिक करतात.मीडियाच्या अश्या वागण्याने कित्येकांती बदनामी होऊन त्यांच करीअर बर्बाद झालेल त्यांना तोंड दाखविन्याच्याही स्थीतीत ठेवलेले नाही.यांना कायद्याचा पैंबध नाही. अश्या धोकादायक अफवांनी निरपराधांना परिणाम भोगावे लागतात.
कोरोना रोगात बहूतेक रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत.तरीपण सारे जनजीवन वातावरण विस्कळित झालेले आहे.तसेच या रोगाचा बुजगावण करून आपण संकट ओढविल्याच चित्र दिसतं आहे.कित्येक कोटींचे नुकसान झाले आहे. आपले सरकार या बद्दल गांभीर्य ठेवत आहे ही कौतूकास्पद बात आहे.परंतू ही उडालेली धांदल कश्याला या साथीचे रोग आधीही आलेले आहेत.या निव्वळ प्रचार माध्यमाने मानसिकतेचा छळ मांडून कळस गाठला आहे.अश्या अफवांना रोखण्यासाठी पाउल उचलायला हवे. आणि स्वत: खंबिर राहून इतरानांही दिलासा द्यायला हवा आहे.
खरंतर हा जगासाठीच एक ब्रेक गरजेचा होता.आधूनिक जग न थांबता यंत्रासारखं सारख धावत आहे , आपल्या जीवाभावाच्याही लोकांना किंवा आप्तेष्ट नातेवाईकांनाही भेटायला बोलायला वेळ नव्हता आता काही दिवस घरी शांत बसून विश्रांती घ्या .एकामेकाची विचारपूस करा.
कोरोनाला न घाबरता आपली प्रतीकार शक्ती वाढवा, आणि स्वतःला,छंदाला,निसर्गाला,आरोग्याला आपला वेळ द्या.हा निसर्गचक्र सतत फिरत असतोय ,कित्येक कोरोनासारख्या माहामारी इथे येवून गेल्यात त्यातुन आपण बाहेर आलो तसेच आताही धीर ठेवून याचा सामना करावा अस मला वाटतय.उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियम आहे ,यातही मार्ग सापडतात ती शोधावी लागतात.
आणि अफवा व्हायरसनेच या समाजाचे स्वास्थ्य नक्कीच बिघडवले जाते आहे. कोणत्याही अफवात्मक व्हिडिओ पोस्ट अथवा मेसेजेसला बळी पडणार नाही यासाठी एक नागरिक म्हणून दक्षता घ्यावी.