युरोप ट्रीपच्या आठवणी
युरोप ट्रीपच्या आठवणी
युरोप ट्रीपला मी माझे मिस्टर बहीण बहिणीचे मिस्टर भाची भाऊ वहिनी भाचा आणि आई असे मजा करायला निघालो. आईचे वय ८१ पण उत्साह १८ वर्षासारखा!!आम्ही तिघेही सहकुटुंब आल्याने आईला खूप आनंद झाला.ही ट्रीप आईने आम्हां भावंडांना sponcer केली , ही विशेष उल्लेखनीय बाब!!
युरोपच्या ट्रीपमधे प्रेक्षणीय स्थळे पुष्कळ आहेत.वयस्कर लोकांना जिथे चालायचे असेल किंवा फारसे बघण्यासारखे नसेल तिथे थांबण्याची विनंती करतात.तशी दोन तीन ठिकाणी केली तरी तिचा उत्साह इतका की ती सर्वांबरोबर उतरायचीच.भाचा भाची आणि आईसाठी रुम मिळायची.ते तिला लागली तर मदत करायचे.गप्पा मारायचे म्हणून ती खूप खूष असायची.
तिच्या उत्साहाची प्रचिती स्वित्झर्लंडला आली.तिथे जायला पहाटे ३वाजता हॉटेल सोडायचे होते.तिला आपणहूनच जाग आली.गजर नंतर झाले.एवढ्या पहाटे तिने आंघोळ केली व भाचीला व भाच्याला उठवले.ते दोघे रात्रीचे किंग.ते तसेच आवरुन निघाले.आंघोळी केल्या नाहीत.तरी ती त्यांना काही बोलली नाही.दूधावरची साय ना!!
आम्ही स्वित्झर्लंडला जातानाचा रस्ता अत्यंत निसर्ग सौंदर्याचा!!तो पण तिने न झोपता मनमुराद एंजाँय केला.
आम्ही स्वित्झर्लंडच्या पिक पाँइंटवर पोचलो.तिथे ज्याःना थंडीचा त्रास होतो त्यांना बसण्यासाठी मोठी काचेची खोली आहे.प्रथम थंडीचा अंदाज घ्यायला भाचा भाची गेले.थोडा वेळ खेळून काकडतच आले.आम्ही म्हटलो एवढ्या लांब आलोत तर जाऊ. आईला पण यावेसे वाटले. तिला भाचा भाचीने नेले. तिनेही तो बर्फाचा अद्वितीय सोहळा बघितला.आम्ही तिथे बर्फ खेळलो. ह्या सर्वात ती थंडी थंडी असे काहीही म्हणाली नाही.
टूरलीडर्स ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी टिपत असतात.आंकाःच्या खेळात मला बक्षिस मिळाले.बक्षिस समारंभ तिच्याच हस्ते केला.सर्वात उत्साही पर्यटकाचे बक्षीसही तिला मिळाले.सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
टूरवररुन आल्यावरही तिने रोजच्यासारखीच विश्रांती घेतली.दमले म्हणून झोपून राहिली नाही. आईच्या उत्साहाला माझे लाख लाख सलाम!!ज्या परमेश्वराने तिला उत्साहाची देणगी दिली त्याचे अनंत उपकार!