Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

पँरासेलिंग चित्तथरारक अनुभव

पँरासेलिंग चित्तथरारक अनुभव

1 min
183


 आम्ही टूर कंपनीबरोबर सिंगापूर थायलंड मलेशिया ट्रीपला गेलो.माझी मैत्रीण शोभना आणि तिचे मिस्टरही होते.

   थायलंडला पँरासेलिंगच्या सेंटररला आलो. शोभना व तिचे मिस्टर करणार होते. आम्हांला पण चला म्हणाले, पण माझ्या मिस्टरांना B.p, , Sugar आणि दोन अँजिओप्लास्टी झालेल्या आणि मलाही B. p म्हणून आम्ही नाही सांगितले.

    आमचा टूरलिडर तरुण आणि सकारात्मक विचारसरणीचा. आम्ही दोघे मागे थांबल्यावर आम्हांला म्हणाला " इथले पँरासेलिंग अगदी सेफ आहे. इथल्याइतके सेफ तुम्हांला इतरत्र कुठेही मिळणार नाही. अजिबात घाबरु नका. तुम्ही दोघही करा पँरासेलिंग " मग आम्हांला वाटले आपण पण करु पँरासेलिंग. शोभनाच्या मिस्टरांना आमची तिकीटे काढायला सांगितली.

   आमचा नंबर येण्याआधी लोक धावत धावत कसे पकडतात ते नीट बघितले.आम्हीही तसेच पळून पँरासेलिंग पकडले .push करायला त्यांची माणसे असतातच. पँरासेलिंगचा आनंद आम्ही जसजसेवर जाऊ लागलो तसा द्विगुणित झाला. तसेच एक दोरी खालच्या लोकांकडे असतेच त्यामुळे भिती पार दूर पळाली. आम्ही एकमेकांना बघत होतो पण हात घट्ट धरलेले. ते सोडण्याची नियमानेच परवानगी नव्हती.

   जसजसे वर जाऊ लागलो तशी मजा वाटायला लागली. मी तर लाखो हैं निगाहमें गाणे गुणगुणायला सुरवात केली. पँरासेलिंगचा निर्भेळ आनंद घेतला .

  फक्त उतरल्यावर चालायला लागताना थोडेसे वेगळे वाटले आणि ते साहजिकच होते. इतक्यावेळ अवकाशात संचार केल्यावर तसे होणारच.

   आम्ही आमच्या टूर लीडरला मनोमन धन्यवाद दिले. त्याच्या प्रोत्साहनामुळेच आम्हांला पँरासेलिंगचा अनोखा आनंद मिळाला. ही सुवर्णसंधी आम्ही सोडली नाही हे फार छान केले. नंतरच्या परदेश सहलींमधे पँरासेलिंग कुठेच नव्हते. संधी असतानाच त्याचा लाभ घ्यायचा असतो हे टूरलीडरचे म्हणणे मनोमन पटले.


Rate this content
Log in