Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

रक्षाबंधन

रक्षाबंधन

1 min
170


  श्रावण म्हणजे सळसळता उत्साह!! पाऊस रिमझिम सरी आणि इंद्रधनूचा गोफ!! श्रावण म्हणजे व्रतवैकल्ये आणि धार्मिक सणांची, पक्वान्नांची अगदी चंगळच! श्रावणी सोमवार, शुक्रवार, गोकुळअष्टमी आणि बहीण भावाच्या प्रेमाचे रक्षाबंधन म्हणजे सणांची अगदी गोड दाटी असते श्रावणात!प्रत्येक सणाला पुरणावरणाचा नैवेद्य असतो पण तब्येतीला त्रास होऊ नये म्हणून नक्त म्हणजे एकदाच जेवायचे व्रत श्रावणातच आपल्या पूर्वजांनी लावले आहे.


  रक्षाबंधनाला बहीण भावाकडे राखी घेऊन जाते. तसेच औक्षणानंतर त्याचे तोंड गोड करायला नारळाच्या वड्याही घेऊन जाते. आपल्या भावाची आवड आणि आवडता रंग तिला पक्का माहीत आसतो. त्याप्रमाणे त्याच्यासाठी ती आधीच राखी आणून ठेवते. दोन-चार राख्या ती जास्तच घेऊन जाते कारण चुलत आत्तेभाऊपण भेटतात.


रक्षाबंधनाला मंगल पवित्र वातावरण असते. आज ती माहेरी आल्याने तिला स्वयंपाकाला सुट्टी असते. आईला नारळ खोवायला गप्पा मारता मारता मदत करते. आज भावाशी निवांत गप्पा होतात. त्यातही चिडवाचिडवी असतेच. आज नारळीभात, नारळाच्या करंज्या गोड पक्वान्न करतात.

  

बहिणीचे रक्षण भावाने करावे म्हणून बहीण भावाला राखी बांधते. त्याला दीर्घायुष्य मिळावे म्हणून त्याला औक्षण करते. नारळाची वडी तोंडात घालून त्याचे तोंड गोड करते. भाऊ बहिणीला साडी, ड्रेस किंवा आवडणारी वस्तू देतो. आई खणानारळानी ओटी भरुन लेकीची सासरी पाठवणी करते. असा हा रक्षाबंधनाचा सण!! बहीणभावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा! श्रावणसरींमधे मनही प्रेमाने चिंब भिजवणारा!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract