Manisha Awekar

Others

3  

Manisha Awekar

Others

आण्णांच्या आठवणी

आण्णांच्या आठवणी

4 mins
257


    आमचे आण्णा भाज्या , फळे भरपूर आणायचे. त्यांची आठवड्याची भाजी लोकांना महिन्याची वाटे.भरपूर भाज्या , कोशिंबीरी आणि फळे खायला असत. त्यांना खाण्यात काटकसर आवडत नसे.घरची केळी , सिताफळे मुबलक असत. त्यामुळे हाडे मजबूत झाली.निरोगी तब्बेतीचा पाया घातला गेला.तेव्हा सोललेले फणस मिळत नसत. केरुनानांकडून हाताला तेल लावून फणस सोलत असत.आमरस काढायला मी व आण्णा बसायचो.पाण्यात टाकलेले आंबे फडक्याने पुसून मी मऊ करुन द्यायची आणि ते पिळायचे. नंतर साली व कोयी मी चोखत असे.

  एकदा खूप आंब्याचा रस काढायचा होता.मी न कंटाळता सर्व आंबे मऊ करुन दिले. कोयी व ससाली चोखताना शेवटच्या दोन आंब्याला खूप गर होता. मी प्रामाणिकपणे गर राहिल्याचे सांगितले.ते हसून म्हणाले " अगं गर राहिला नाही ,ठेवला आहे. तू इतके मोठे आंबे न कंटाळता मऊ करुन दिलेस. खा आता गर"

तेव्हा खूप आनंद झाला. मी केलेल्या कामाची त्यांनी कदर केली त्याचा आनंद झाला.त्यामागचे प्रेम आत्ता समजते आहे.


  आमचे आण्णा विनोदी आणि हजरजबाबी!!तेव्हा आम्ही वाड्यात रहायचो. एकदा समोरच्या तुळपुळ्यांच्या रजनी आणि संध्या मी आणि आई बाहेर उभ्या असताना म्हणाल्या " तुमच्या जयूचा चेहरा अगदी कंपाससारखा गोल आहे.तुमची जयू काळी आसली किती स्मार्ट आहे" तेव्हा वय ३-४ वर्षाचे.समज अपुरी. त्या गमतीने म्हणल्या होत्या.आईने हसतखेळत घेतले.मी मात्र आण्णांची वाट बघत बसले.आण्णा आल्यावर त्यांना म्हणाले "मला रजनी आणि संध्या तुमची जयू काळी आहे असे म्हणाल्या "

आण्णा लगेच म्हणाले त्याःना म्हणायचं की " असूं दे काळी, पण मनानी गोरी " माझ्या मनाचे समाधान होईना. बालमनच ते!!मग दुस-या दिवशी आण्णांनी त्यांना बाहेर बोलावून घेतले व हसतहसत म्हणाले " तुम्ही आमच्या जयूला काळी म्हणालात..बघा ती काय उत्तर देतीयं "

" असूंssssदे काळी पण मनाssssनी गोरी असे म्हटल्यावर सगळेच हसायला लागले.आण्णांनी मला कडेवर घेतले.मग मी पण हसायला लागले.

 काही व्यक्ती जीवनात आपला ठसा उमटवून जातात.त्यांची आठवण , त्यांनी शिकवलेल्या चांगल्या गोष्टी आपल्याला आयुष्यात संस्मरणीय असतात.

   सुरवात लहानपणापासून करते.सकाळी उठल्याउठल्या ज्या त्या हाताने पांघरुणाची घडी करुन आपली गादी गुंडाळून ठेवण्याबद्दल ते आग्रही असत.तसेच आपली कपबशी आपणच विसळली पाहिजे अशी त्यांची शिस्त होती.

   पानात काहीही टाकायचे नाही.बोटांच्या खाली जेवण येता कामा नये .अगदी आजसुद्धा अन्नदाता सुखी भव म्हणताना आपले ताट स्वच्छ आहे ना, हे बघायची सवय आहे.

   आण्णांना वेगवेगळे पदार्थ खायची आवड होती.त्याचा आस्वाद मजेत घ्यायचे. मी 10-12वर्षाची झाल्यावर सःध्याकाळी आईला स्वयंपाकात मदत करायची सूचना त्यांचीच.त्यामुळे मी स्वयंपाक लवकर शिकले.आईच्या अडचणीत ते मला स्वयंपाकात मदत करायचे.त्यांच्या हातचा रस्सा अप्रतिम असायचा.स्वयंपाकघरात पसारा होणार नाही ह्याची मला काळजी घ्यायला शिकवले. रस्सा करताना ज्या त्या हाताने वस्तू जागेला ठेवल्या तर पसारा होत नाही हे कृतीतून सांगायचे.इथे काही केलंय असे वाटता कामा नये इतका स्वच्छतेचा आग्रह.आजही आवरत आवरत करायची सवय लागल्याने मागचे आवरणे पुष्कळ सुसह्य होते.

   त्यांचे Drafting आणि हस्ताक्षर सुंदर होते. नोकरीला लागल्यावर सहा महिन्यातच Cda सरांकडे पाठवायचा draft त्यांनी आँडिटर असून छान लिहिला.खरे तर असे draft आँडिटर लिहित नाहीत. वरचेअधिकारी लिहितात.पण त्यांनी Case study करुन disposal लिहिले. वरिष्ठांनी त्यात काही सुधारणा केल्या.सी डी ए सरांकडे draft गेल्यावर त्यांनी जिथे सुधारणा केल्या होत्या , तिथे State आसे लिहिले ,एवढेच नाही तर

Good hand writing good drafting.

Who is the auditor please. असा चांगला शेराही मारला.त्यांच्या बाँसनापण आनंद झाला. फक्त सहा महिन्याच्या सर्व्हिसवर सीडीए सरांकडून चांगले रिमार्क्स मिळणेही खूप मोठी गोष्ट होती. ते लगेच आण्णांना घेऊन सीडीए सरांकडे घेऊन गेले.

  त्यांना पैसे खाणे खोट्या लांड्यालबाड्या करणे ह्या गोष्टींची चीड होती.काही लोक भ्रष्टाचाराबद्दल गप्पा खूप मारतात पण अशांच्या घरी M E Sचे बल्ब पाहिल्यावर त्यांचे मन विषण्ण होई.त्यांना UAGE म्हणून पुलगावला पोस्टिंग मिळाले.तेव्हा डबल खर्च आम्ही शिकणारे.अशा परिस्थितीत एखाद्याने हात धुवून घेतले असते पण बोले तैसा चाले ही उक्ती त्यांनी सार्थ केली. मँथ्यू नावाच्या माणसाला UABSO मिळाले होते त्याला UAGE आपणहून दिले.अडचणीतही आपले तत्व सोडले नाही.

  मी लहान असताना दर आठवड्याला मुंबईहून खेळणे आणायचे.मी पुढच्या आठवड्यापर्यंत ते मोडलेले असे.तरी ते आणतच राहिले.मी मोठेपणी त्यांना विचारलेही "आण्णा मी जर खेळणं मोडायचे तर तुम्ही परत कशाला नवीन आणायचात?

त्यावर ते हसले आणि अतिशय समर्पक उत्तर दिले " तुला मुलं झाल्यावर कळेल ते " स्वतःकडे मोठेपणा न घेता एका वाक्यात त्यांनी सांगितले .

  त्यांना गरीबांबद्दल खूप कणव होती. शिपाई लोक " साहेब भाजीला पैसे ननाहीत देता का जरा" असे म्हटल्यावर लगेच पैसे काढून द्यायचे.त्यांना कोणी असेही सांगायचे की ही लोक दारु पिणारी आहेत.तरी ते द्यायचे पण खडसावून बजावायचे" ह्याची भाजीच घेतली पाहिजे.दारु प्यायची नाही"

चांगले पौष्टिक खाण्यावर खूप भर असे.त्यामुळेच मी तब्बेत ह्या वयातही टिकवून आहे. ५५वर्षापर्यंत बँडमिंटन खेळू शकले.त्यांना आणि वैजूला कलमी पेरु फार आवडायचे.बेबीसाठी घ्या म्हटल्यावर लगेच घ्यायचे.रविवार गप्पांचा वार असायचा.त्यावेळी आँफिसमधल्या लोकांच्या नकला करुन दाखवायचे.

  पुढे आमच्या घरावर तरुण काका गेले आजी परगावी वारली असे दुःखद धक्के बसले.काकाच्या कुटुंबाची काकू तीन मुली ह्यांची जबाबदारी आल्याने त्यांना खूपच मानसिक आर्थिक त्रास झाला.माझ्याजवळ जितक्या चांगल्या आठवणी आहेत तितक्या दुर्दैवाने माझ्या धाकट्या भावंडांजवळ नाहीत ह्याचे मला आजही वाईट वाटते.नंतर परिस्थितीमुळे वैतागून शेवटी चिडणार कोणावर?आई आणि आमच्यावरच.

  ह्या सर्वाचा वाईट परिणाम हार्टवर होऊन त्यांचे अचानक निधन झाले.

  हे लिहितानाही मन भरुन आले आहे.त्यांनी पाळलेली तत्वे आणि शिकवलेल्या गोष्टी आचरणात आणायच्या हेच मी माझे कर्तव्य समजते.


Rate this content
Log in