Manisha Awekar

Abstract

2  

Manisha Awekar

Abstract

आण्णांच्या आठवणी

आण्णांच्या आठवणी

2 mins
112


   मी तेव्हा ८-९ वर्षाची होते. संध्याकाळी ५-३० वाजता अशीच रुसून बसले होते. ही खरं तर माझी खेळायची वेळ.

माझे वडील आण्णा मला म्हणाले " काय गं जयू , आज खेळायला नाही का जायचे?अशी का बसली आहेस ?"

मी म्हणाले " आण्णा माझ्या सगळ्या मैत्रिणी सायकल चालवायला शनिवार वाड्यावर गेवाल्या आहेत.

आण्णा म्हणाले " मग तू पण जायचं की "


मी घुश्श्यातच म्हणाले " काय करायचंय जाऊन? मला सायकल चालवायला थोडीच येते? त्यांच्या ताई-दादांनी शिकवलीय त्यांना सायकल. मला कुठे ताई-दादा आहेत शिकवायला?मला कोण शिकवणार?" आसे म्हणता म्हणताच मला रडू कोसळले.

आण्णांनी मला जवळ घेतले.

" अगं मी शिकवतो तुला सायकल.चल आपण शनिवार वाड्यावर भाड्याने सायकल घेऊ"


   माझी कळी लगेच खुलली. आम्ही शनिवार वाड्यावर सायकल घेतली.थोडीशी उंच सायकल निवडली,त्या दिवशी मला फक्त हॉपिंग शिकवले. मला सायकल उंच असल्याने जमले पण!!खूपच आनंद झाला.


   दुसऱ्या दिवशी आण्णांना आँफिस होते. मी आवरुन वाटच पहात होते." आण्णा जायचं ?" माझा अधिरा प्रश्न तेव्हा कुठे कळत होते की ते दमले असतील जरा बसू द्यावे.

"अगं हो हो मला फ्रेश होऊन चहा तर घेऊ दे" इतके दमलेले असूनही कपबशी ठेवली की लगेच निघाले.


   आज मला लेडीज सायकलवर हाँपिंग करत करत पाय कसा टाकायचा ह्सृयाची तालीम दिली. बँलन्स सांभाळायला ते माझ्याबरोबर पळत होतेच. नंतर हळूहळू सीटवर बसायला शिकवले.रोज तोल सांभाळण्यासाठी माझ्या सायकलबरोबर ते पळत असत.पळता पळता मला प्रोत्साहन देत असत. ते कधी रागावले नाहीत का चिडले नाहीत.खरं ते खूप दमून यायचे पण कधीही दमलो म्हटले नाहीत की कधी कंळा आला असे म्हटले नाहीत.


  महिनाभर रोज माझ्याबरोबर शनिवार वाड्यावर येऊन त्यांनी मला सायकल शिकवली.हे त्यांचे खूप मोठे उपकारच माझ्यावर आहेत ,पण तेव्हा " थँक यू" म्हणायचेही लक्षात आले नाही.या लेखाद्वारे त्यांना वंदन करुन थँक यू म्हणते.


   सायकल शिकल्याने पुढे माझा क्लासेस कॉलेजला जायचा वेळ वाचला.आँफिसलाही टू व्हिलरवर जाऊ शकले.सायकल येत असल्याने टू व्हिलर लगेच आली.


  आण्णा तुम्ही सायकल शिकवल्याने बालपणी खेळाचा आनंद मिळाला. पुढे वेळाची बचत झाली.माझे आयुष्य सुकर झाले.तुम्हांला लक्ष लक्ष प्रणाम आणि कोटी कोटी धन्यवाद!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract