Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

मूर्तीमंत भगवंत

मूर्तीमंत भगवंत

5 mins
229


     काल रात्री उशीरापर्यंत मीनलच्या अमेरिकेतल्या ट्रीपचे फोटो बघितल्याने , जगदीश आणि जानकी निवांत झोपलेले.तेवढ्यात दारावर टकटक ऐकू आली.

" अगं कोणी आलंय का?"जगदीश म्हणाले

" अहो , तुम्ही अर्धवट झोपेत आहात. एवढ्या सकाळी सकाळी कोण येणार?झोपा बरं" जानकी म्हणाली

पुन्हा तोच आवाज.जगदीश तसेच चाचपडत दार उघडायला गेले.

मोठी बँग घेऊन मीनल आलेली बघून , त्यांना आश्चर्याचा 

धक्काच बसला.

"अगं जान्हवी मीनल आलीयं"

मीनल हंबरडा फोडून रडायला लागल्यावर त्यांच्या हातापायाला कंप सुटून मस्तक गरगरु लागले. प्रसंगावधान राखून आईने स्वतः पाणी पिऊन , त्या दोघांना पाणी दिले

" आई बाबा मी काय करु हो!!

मी पुरती फसले हो!! त्याची एक प्रेयसी आधीपासूनचीच होती. मी आवडले म्हणून माझ्याशी लग्न केले. सांगा एका म्यानात दोन तलवारी कशा रहायच्या?जाब विचारायचीही सोय नाही.Live in relationship असे त्यांचे मोकाट वागणे चालू आहे.

"हे खपवून घ्यायचे असेल तर रहा" असे मला निर्दयीपणाने सांगितले .मला डोळ्यादेखत सगळे सहन करणेआशक्य झाले तेव्हा घटस्फोट देऊन , माझ्या तोंडावर तिकीट फेकून मला हाकलून दिले.मला तेव्हा समजले की त्याला लग्न तिकडे का करायचे होते!! मी काय खेळणं आहे?आवडलं खाळलः, कंटाळा आला सोडून दिलं!!मी जितीजागती त्याची लग्नाची बायको समोर असल्याचीही त्या दोघांना चाड नव्हती." इकडे सगळं असंच असतं" अशी मुर्दाड बतावणीही केली"

  " आई बाबा माझे डोळे आता पुरते उघडले आहेत.आता मला आधी माझ्या पायावर उभे रहायचे आहे.प्रेमाचा नकली बंगला मनातून जाळून टाकायचा आहे. प्रेमानी मी आंधळी झाले होते. हे मुखवट्यांचं जग फार फसवं असतं हो.आता ही दुनिया कशी आहे चांगलं समजलंय मला.आई बाबा मी तुमची अनंत अपराधी आहे. मी खूप चुकले. मला क्षमा करा!!"

  आई बाबांनी डोळे पुसले. त्याःना जाणवले की जे ऐकायला इतके भयानक वाटले, ते मीनलने एकटीने कसे सहन केले असेल? एवढ्या महाभयंकर दिव्यातून जाऊनही किती पटकन सावरली आहे मीनल!!

  " एकेक वेळ असते प्रेमात फसायची!! ही वाटच फार निसरडी आहे. जाऊ दे मीनल जे झालं ते झालं. आता पुढचे आयुष्य सजगपणे आणि सकारात्मकतेने जग.आम्ही आहोत तुझ्या पाठीशी"

  आई बाबांच्या आश्वासक शब्दांनी मीनलला उभारी आली. त्या दोघांना ती हलकेच बिलगली.


 मीनलपुढे जुनी पाटी पुसून नव्या जीवनाला सामोरे जायचे आव्हान होते. कितीही झाले तरी तिचे पूर्वी जॉर्जवर मनापासून प्रेम होते. कधीकधी ती जुन्या आठवणींनी व्याकुळ व्हायची. फोनमधले फोटो बघून घळाघळा रडायची.काय चूक होती तिची?संसाराचा सारीपाट कुणी नटमोगरी उधळून लावेल आसे तिला स्वप्नातही वाटले नव्हते.

   ती रडायला लागल्यावर दोघांचेही डोळे भरुन यायचे. किती हुशार , गुणी , सुंदर मुलगी आपली!!आणि काय तिच्या नशिबाला आले.दैव जाणिले कुणी हेच खरे.ते तिला रडून मोकळे होऊन देत.नंतर समजावून सांगायचे.

" अगं जीवनात असे काही अपघात असतात.माणसे ओळखताना तरुणाईत चूक होते.पण आता हळूहळू सावरायला नको का?"

  आईबाबांनी तिला आश्वासक शब्दांनी धीर दिला की तिला बरे वाटायचे. " तरी मी तुला सांगितलं होतं"हे शांताबाईंचे लेखामधील वाक्य आठवल्यावर , तिला आईबाबांबद्दल खूप आदर वाटायचा. ते दोघेही तिला कधीच " तरी मी तुला सांगितलं होतं " हे वाक्य कधीच बोलले नव्हते. चूक आपलीच झाली. जॉर्जला ओळखणाण्यात आपणच चुकलो.

  अशा guilty consious मधे ती खूप वेळ विचार करत बसे.कोणाचाच इलाज नव्हता. शेवटी काळ हेच अशा दुःखावरचे औषध असते.

   काही काळाने ती कधीकधी टिव्ही सिरियल्स बघू लागली. आईबाबांशी गप्पा मारु लागली.

  एक दिवस तिच्या जुन्या कंपनीतून फोन आला. त्यांना कामात अडचण आल्याने , तिला बोलावणे आले.ती कामात हुशार असल्याने , त्वरितच जाऊन तिने मेहनत घेऊन तो प्राँब्लेम सोडवलाही.तिला मँनेजरनी "परत जॉईन व्हाल का? " असे विचारले.तिनेही होकार दिला व परत नोकरीला सुरवात झाली.ह्यात वेळेची engagement आणि स्वतःच्या पायावर उभे रहाणे अशा दोन्ही गोष्टी साध्य झाल्या होत्या.ही युक्ती बाबांनीच शोधून काढली होती. मीनल एक तर स्वाभिमानी आणि नोकरी मिळवण्यासाठी आपणहून जाण्यासारखी तिची मनस्थिती नव्हती. म्हणून तेच स्वतः तिच्या कंपनीत जाऊन तिच्याविषयी सांगून आले होते.फक्त मीनलला काही बोलले नव्हते. तिच्या आयुष्याला आकार देण्यासाठी ही सारी धडपड !!

   शेजारी , नातेवाईकह्या सर्वांना त्यांनी खरी परिस्थिती 

सांगितली आणि त्यामुळेच सगळे तिच्याशी पूर्वीसारखेच मनमोकळेपणाने बोलायला लागले.दुःखाचे मळभ आता काळाबरोबरच पुढे सरकू लागले.

  नियती आपली चक्रे फिरवतच असते.तिच्या मनात कधीकधी सकारात्मक बदलही असतात.गप्पा मारायला एक दिवस शेजारच्या ज्योतीताई आल्या. " काकू आपली मीनल आमचा प्रथमेश ह्यांनी काय पाप केले होते हो?इतका चांगला मुलगा पण त्याच्या बायकोचे आधीच दुस-या मुलावर प्रेम असल्याने १५ दिवसातच ह्याला सोडून गेली. आपण पूर्वी प्रथमेशचे स्थळ पाहिले होते पण मीनलनेच नकार दिला होता"

   पेपर वाचणारे बाबा सर्व संभाषण ऐकतच होते.प्रथमेशच्या घरी जाऊन सर्व खरी परिस्थिती सांगून मीनलबद्दल शब्द टाकून आले.आता सहज भेटून अंदाज घ्यावा असे प्रथमेशने ठरवले.ज्योतीताईःच्या घरी दोघांना बोलावून घेतले.

   मीनलपुढे एक वेगळीच समस्या उभी राहिली.तिला मातृत्वाची चाहूल लागली होती.मातृत्वाची चाहूल हा स्त्रीच्या आयुष्यातील असीम आनंदाचा क्षण पण दैवदुर्विलासाने तोही काळवंडून गेला होता.डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पहिल्याच वेळी गर्भपात करु नये असे होते. जान्हवीच्याही डोळ्यांना धारा लागल्या. ज्या नातवंडासाठी ते दोघेही आतुरले होते , ते असा विचित्र प्रश्न घेऊन येईल असे स्वप्नातही वाटले नव्हते.

   "ज्योतीताईंच्या घरी भेटण्याऐवजी तुम्ही दोघे बाहेर जेवायला जा. तुझी सर्व खरी परिस्थिती त्याला समजावून सांग. मग बघू पुढचे "बाबांनी

हा तोडगा काढल्याने मीनल जरा निर्धास्त झाली. दैवाच्या गती किती आगळ्या असतात.प्रथमेशशी बोलण्यास मीनल आतुर असतानाच नियतीने हा फासा टाकला होता.

  मीनल आता टक्क्याटोणप्यातून चांगली शहाणी झाली होती.तिचे गर्भातल्या कोवळ्या जीवावर आत्यंतिक प्रेम असल्याने , तिला प्रथमेशला सर्व सांगावे लागणार होते. एवढी नाजूक गोष्ट अपरिचित व्यक्तीसमोर सांगायची म्हणजे संकोच , स्त्रीसुलभ लज्जा आड येणारच.हिरकणीने जशी बाळासाठी प्राणांची पर्वा न करता कड्यावरुन उडी मारली , तसेच धैर्य तिने एकवटले आणि प्रथमेशला सर्व खरे सांगायचे ठरवले.

    ठरल्याप्रमाणे दोघे जेवायला हॉटेलमधे गेले.प्रथमेशने आपली खरी कहाणी तिला सांगितली. त्याच्याबरोबर तिच्याही डोळ्यांत पाणी तरारले.तिने तिची हकीगत सांगताना कशा परिस्थितीला तोंड दिले हे ऐकताना प्रथमेशचा थरकापच झाला.शेवटी बाळाचा मुद्दा निघाल्यावर ती घळाघळा रडायला लागली.तिला हुंदके आवरेनात.

प्रथमेश म्हणाला " मला सर्व समजले आहे. तुझी आणि त्या निष्पाप जीवाची काहीही चूक नसताना तुम्ही भरडले गेले आहात.आपण आत्ता चुकीचा निर्णय घेतला , तर तुला पुढेही मातृत्व लाभणार नाही. मी आज सर्व माझ्या घरी सांगतो.

माझे आईवडीलही त्या लहरी मुलीमुळे खूप भरडले गेले आहेत.ते नक्कीच सकारात्मक विचार करतील.आपण भेटू नंतर."

  प्रथमेशच्या आश्वासक शब्दांनी तिला खूप धीर आला. जगात इतकी चांगली माणसे असू शकतात , ह्यावर तिचा विश्वासच बसेना.आपल्या मुलावर सगळेच प्रेम करतात , पण परक्या मुलाला आपले मानणारा प्रथमेश तिला मूर्तीमंत भगवंत वाटला. किती मोठे मन आहे ह्याचे!!आपण चांगले सहजीवन जगू.विचाराःची सुखद आवर्तने थांबत नव्हती. तिला वाटले आपल्या हातात असते तर रात्र फिरवून उद्याचा दिवस आणला असता.विचारांच्या नादात तिला झोप लागली.

  सकाळीसकाळीच प्रथमेशचा फोन आला.

" सुप्रभात. मी सर्व घरी सांगितले आहे. आईवडीलांना सर्व पसंत आहे.आम्ही दुपारी साखरपुड्याच्या तयारीनेच येत आहोत . तू साडी पसंतीला ये 10 वाजता."

" हो येते हं" लाजून मीनल

" अरे , सगळी पायाभरणी मी आणि आईने आधीच केली होती. आम्हांला काय घेणार?"

" बाबा तुमचा चेष्टेखोर स्वभाव काही जात नाही हं!!माझे आयुष्य सावरलेत तुम्ही!!त्याच्या तोलामोलाची कोणती गोष्ट देणार?"

" तुझ्या चेह-यावरचे सुहास्य!!

Smile costs nothing but gives you much!!"

सर्वजण हास्यकल्लोळात बुडून गेले.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract