" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

2  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

यशाचा मूलमंत्र..

यशाचा मूलमंत्र..

2 mins
57


मला एका महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनासाठी बोलावण्यात आलं होतं.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम होता.शालेय विद्यार्थ्यांसमोर बोलायचे म्हणून यश, यशाचं महत्त्व आणि यशाचा मूलमंत्र यावर मला बोलायचं होतं.शिक्षक, विद्यार्थी,पालक अशी बरीच उपस्थिती होती.मुलांनाच विचारलं यश म्हणजे काय नी बरेच विद्यार्थी बोलके झाले.यश कशाला म्हणतात ते सांगू लागले.अनेकानी अनेक विचार मांडले.. ध्येय साध्य होणे.. प्रयत्नाचं फलित.. याप्रमाणे विषयाची मांडणी करून त्यांना यश म्हणजे काय ते पटवून दिलं . यशाचं महत्त्व पटल्यामुळे यश हे सहज मिळत नाही हे ही त्यांना समजायला वेळ लागला नाही.यशवंत होणं तेवढं सोपं नसतं म्हणून यशांला महत्त्व असतं.सहज मिळतं ते यश कसलं ! प्रत्येकाला यशाची अपेक्षा असते.यशासाठीच सारे धडपड करत असतात.कुठल्याही परिस्थितीत, काहीही करून यश मिळवायला हवे असे प्रत्येकालाच वाटते.पण सारेच यशस्वी होत नसतात म्हणून तर स्पर्धा निर्माण होते.

  स्पर्धेच्या युगात यशाला अधिकच महत्त्व प्राप्त होते नी यशासाठी धडपड सुरू होते.प्रयत्न कमी पडले की अपयश येत नी अपयश कोणाला हवं असतं.अपयशामूळे माणूस खचतो,अपमानीत होतो . तिरस्कार करायला लागतो.अपयश पचवणं तेवढं सोपं नसतं नी अपयशाने खचून ही जायचं नसतं.मुळात अपयश हे आपले डोळे उघडण्यासाठी असतं.आपलं आत्मपरीक्षण असतं . आपल्या चुका,आपला न्यूनगंड, अहंगंड,अति आत्मविश्वास, बेसावधपणा, ज्ञानाचा अभाव, योग्य नियोजन, पुरेसा सराव, मेहनत, जिद्द, प्रयत्नाचा अभाव नी सातत्ये या गोष्टीचं महत्त्व कळणे नी यातील दोष दूर करणे नी परिस्थितीला दोष न देता सर्व संकटे, परिस्थिती वर मात करून यश प्राप्त करणे गरजेचे असते.. म्हणजे च यश कधी सहज मिळत नाही यशवंत हेच किर्तीवंत असतात.. जेवढं मोठं यश तेवढी तुमची किर्ती मोठी असते.यश मिळवण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान, परिश्रम, नियोजन,सराव नी सातत्याची गरज असते.अपयश येवून ही जे खचत नाहीत, प्रयत्न सोडत नाहीत ते यशस्वी होतातच.प्रयत्नाला यश हमखास येतंच.फक्त प्रयत्न कमी पडले म्हणून अपयश यायला नको.अपयशही पचवायला शिकावं तरच माणूस टिकतो,शिकतो,सुधारतो नी यशस्वी होतो.

    माणूस मोठा होतो तो त्याचा यशामुळे म्हणून च जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं म्हटलं जातं.यशासाठीची धडपड थांबली की माणूस संपतो.यश तुमच्यासाठी हमखास असतं फक्त ते तुमची वाट पाहत असतं तुम्ही तिथपर्यंत पोहचायला हवे.म्हणूनच थांबला तो संपला असं म्हटलं जातं.

   यशासाठी प्रयत्न करायलाच हवेत.प्रयत्न कधीच कमी पडायला नको आणि यशासाठी वाम मार्गाचा अवलंब ही व्हायला नको.

  यश नी अपयश पचवणं तेवढं सोपं नसतं ते पचवताही यायला हवं.अपयशा इतकंच यश ही पचवणं अवघड असतं.जे यशवंत आहेत ते खरोखरच प्रेरणादायी नी जगाचे आदर्श असतात.तसा आदर्श आपणही निर्माण करणे गरजेचे असते.तुम्ही आपला आदर्श निर्माण करायला हवा ते यश तुम्हाला लाभो हीच अपेक्षा व्यक्त करुन सर्वांना यशाच्या नी उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या...

    जगातील प्रेरणादायी, यशवंतांची उदाहरणे त्यांची मेहनत नी शुन्यातून विश्व कसं घडवता येतं ते दाखवून दिलं असंच यश त्यांच्या कडून अपेक्षित असून त्यांनी ते मिळवावं आपलं देशाचं नाव मोठं करावं अशी अपेक्षा व्यक्त केली.. जीवनात प्रत्येकालाच मोठं यश हवं असतं तसं ते सर्वांना लाभो यासाठी हा एक प्रयत्न...

  सर्वांनी शांततेनं ऐकून घेतले नी आभार मानले मी निश्चितच यशस्वी झालो.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract