पती पत्नीचं खरं प्रेम
पती पत्नीचं खरं प्रेम
*खऱ्या पती पत्नीचं प्रेमच खरं असतं...* पती पत्नी म्हणजे पती पत्नीच...पती पत्नीचं नातं तसं पवित्र च ...पती पत्नीत कुठून आलं खरं, खोटं? देव जोड्या लावतो म्हणतात... सर्वसाक्षी ने सर्वांच्या शूभाशीर्वादाने सात फेरे घेऊन जन्मभर नव्हे सात जन्म... जन्मोजन्मी हाच जोडा रहावा ह्या अपेक्षेने दोघे ह्या बंधनात बांधले जातात नी एकमेकांना सर्वस्व अर्पण करून सर्व सूख, सुखी संसार नी जीवन सार्थक व्हावे अशी स्वप्ने ते पहात असतात... या नात्यात ही असते का खरे खोटे पण.?..होय हे पती पत्नीचं नातं आता फार फारच नाजूक झालं आहे... कधी काय होईल याचा भरोसा च नाही कारण काय तर म्हणे हे कलीयुग आहे... काही ही असो, आज आजही असे काही पती पत्नी आहेत की त्यांना पाहून खरंच हेवा वाटायला लागतो... इथं प्रश्न गरीब श्रीमंतीचा नाही...नात्याचा , पावित्र्याचा नी विश्वासाचा आहे...पती पत्नीच्या नात्यात समर्पन आलं... संसाराच्या रथाची दोन चाके म्हणतात... एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे असे कितीतरी पती पत्नी पहायला मिळतात...त्यांचा खरंच सोन्याचा संसार असतो... अगदी दृष्ट लागण्या सारखा... एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे खरे पती पत्नी त्यांचं प्रेम हे खरं प्रेम असतं नी त्यांचं नातं हे खरं नातं असतं अगदी देवानेच जोडा बांधलेला असतो... जन्मभर... जन्मोजन्मी...सात जन्म नव्हे शत जन्म सुखाने जगण्यासाठी... खऱ्या पती पत्नीचा संसार खरंच सुखाचा असतो.. म्हणजे जीवनाचं सार्थक झालं च म्हणायचे... असे खरे पती पत्नी नी खरं प्रेम लाभायला भाग्यच लाभतं म्हणायचे... ज्याचं खरं प्रेम ते खरे पती पत्नी...नी जे खरे पती पत्नी त्यांचं खरंच प्रेम असतं.. प्रेमानं राहणारे, एकमेकांवर भरभरून प्रेम करणारे, एकमेकांना समजून घेणारे पती पत्नी दुःखी कसे असतील?असे जोडीदार सर्वांना मिळावेत नी सर्वांचाच संसार सुखाचा व्हावा... पती पत्नीचं नातं नुसतं नातं नाही तर जीवनाचं सार्थक च आहे... म्हणून खरे पती पत्नी हे खरंच सुखी असतात... हे सुख सर्वांना मिळायला च हवं गायकवाड आर.जी.दापकेकर... ९८३४२९८३१५
