आंबेडकरांचा वारसा जपणे आवश्यक
आंबेडकरांचा वारसा जपणे आवश्यक
*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार नी कार्याचा वारसा जपणे आवश्यक* ... डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलावं, लिहावं तेवढं कमीच ! शेवटी म्हणावं लागतं बाबासाहेब... बाबासाहेबंच होते... त्यांचं शिक्षण, अभ्यास, ज्ञान, विद्वत्ता, विचार नी कर्तृत्व पहाता त्यांच्यासाठी, ज्ञानसागर, ज्ञानसूर्य,महामानव,.... सर्व उपमा कमीच...! अस्पृश्यता नी दारिद्रय वाट्याला येवून ही जगभर किर्ती कमावणारे डॉ .बाबासाहेब आंबेडकर किती महान नी किती ज्ञानी...! डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं उद्धार कार्य कधीच कोणाला जमण्यासारखे नाही.त्यांची बरोबरी करणारा तर *न भुतो न भविष्येती* ... म्हणजे न झाला न होणारं...त्यांचे विचार नी कार्य म्हणजे जगाला मिळालेली देणं, वरदानच आहे.आज डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नी कार्याची खरी गरज असून " या बाबा जन्मास तुम्ही, जा आम्हा पुन्हा उध्दारुनी, राहिले कार्य तुमचे जे अधुरे... ते अधुरेच आहे अजुनी..." असेच म्हणावे लागेल. दिखावू,नाटकी, ढोंगी दुनियेत बाबासाहेबांच्या नावाचा ही गैरवापर होताना दिसतोय.त्यांच्या विचार नी कार्याचा अवलंब करणारे, त्यांच्या चळवळीचे खरे अनुयायी नी वारस कोणाला म्हणावे हे ही समजणे कठीण झाले आहे...आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नी कार्याची चळवळ कुठे आहे ? त्यांना अपेक्षित कार्य या चळवळीच्या माध्यमातून, त्यांच्या कार्यकर्ते, अनुयायांकडून घडते का ? नी त्यांचे खरे अनुयायी कोण ? ते त्यांच्या विचार नी कार्याचा वारसा कसा जपतात यांचा अभ्यास करण्याची वेळ आली आहे. मी तर म्हणेन डॉ .बाबासाहेब आंबेडकर आमच्या नुसते मुखात नी डोक्यावर नकोत , बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने आमच्या रक्तात, श्वासात, नसानसात, रोमारोमात,हाडामांसात हृदयात नी डोक्यात हवेत... डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचण्यांपेक्षा, विश्व कल्याण, अखील मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेल्या विचार, कार्य नी मार्गाने चालणे आवश्यक आहे. त्यांचे विचार, कार्य, लेखन समजून घेऊन त्यांचा अंगीकार करणे, प्रसार नी प्रचार करणे , बहुजन,दीन दलितांचे कैवारी म्हणून त्यांनी जे कार्य केले, त्यांना जे कार्य अपेक्षित होते, किंवा त्यांचे जे अधुरे कार्य असेल ते करण्यासाठी शपथ घेणे व आयुष्य वेचणे आवश्यक असून त्यांच्या विचार, कार्याचा अंगीकार करुन वारसा जपणारा, मार्गक्रमण करणाराच खरा भीम सैनीक, अनुयायी नी वारस ठरु शकतो...खरा भीम सैनीक, अनुयायी,वारसच मानवी मूल्ये जपून उद्धार कार्य करून जगाला धम्माकडे नेऊ शकतो...सत्य, अहिंसा नी शांतीचा मार्ग दाखवू शकतो.एवढं करण्यासाठी आम्हाला डॉ .बाबासाहेबांचे विचार नी कार्य अंगीकारणे आवश्यक आहे... डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार नी कार्याचा वारसा त्यांच्या चळवळीने, अनुयायी,वारस नी कार्यकर्ते यांनी करायलाच हवा... बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, कार्य प्रत्येक घराघरात नी माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. " बाबा तुम्ही आम्हाला, माणूस बनविले, कैवारी तुम्ही दीनांचे तुम्हीच उध्दारीले. गरज तुमच्या अजून आहे विचार, कार्याची , गेले विसरून तुमचे ॠण हैवान लोक झाले...! गायकवाड आर.जी.दापकेकर जि.नांदेड 9834298315

