" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

2  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

माणसा - थोडंसं स्वतःला ओळखायला

माणसा - थोडंसं स्वतःला ओळखायला

2 mins
37


माणसाने स्वतः बरोबरच जगाला ओळखायला शिकले पाहिजे ,ज्याला हे व्यवस्थित जमेल तो यशस्वी झाल्या शिवाय राहत नाही.

    माणसाची ओळख तीन स्तरांवर असते, एक स्वतः ची ओळख, कुटुंबातील ओळख नी समाजातील ओळख... यशस्वी माणूस तीनही स्तरावर वेगळी नी प्रभावी ओळख निर्माण करु शकतो.कुटुंबात नी समाजात ओळख निर्माण करण्यासाठी कर्तृत्वाची गरज असते.ज्ञान, बुद्धी आणि जिद्दीच्या जोरावरच व्यक्ती आपली ओळख निर्माण करु शकतो.परिश्रम नी नियोजनाने तुम्ही हवं ते यश मिळवू शकता.तुमचं यश हीच तुमची ओळख असते म्हणून यश हे सहज कधीच मिळत नाही.. जेवढे मोठे यश तेवढे परिश्रम आवश्यक असतात.म्हणून यशासाठी प्रयत्न आवश्यक च असतात...यशाचा पाठपुरावा करायचा असेल तर प्रयत्न कमी पडायलाच नको.. त्यासाठी आत्मविश्वास नी जिद्द हवी असते.

   मी हे करु शकतो.असा आत्मविश्वास स्वतः मध्ये आवश्यक असतो.प्रयत्नवादी माणसात आत्मविश्वास निर्माण होतो.तुम्ही स्वतःला ओळखायला विसरू नका... स्वतःचे गुण दोष स्वतःच ओळखायला शिका...दोष ओळखून वेळीच दूर करा नी तुम्ही तुमचा आदर्श निर्माण करा.. शून्यातून विश्व घडवणे सोपे नसते...जे जगाला जमत नाही ते माणसाने करून दाखवणे आवश्यक असते.कुटूंब आणि समाजासाठी तुमचे योगदान आवश्यक असते.. तुम्ही तुमच्या योगदानातूनच तुमची ओळख नी आदर्श निर्माण करु शकता... समाज कर्तृत्ववान व्यक्तींची नोंद घेतो... अशा व्यक्तींची नोंद इतिहासात होते.तुम्ही तुमची नोंद, ओळख कर्तृत्वाने करु शकता.जगाचे कल्याण करणारी माणसं अजरामर होतात.त्यांचं अजरामर कर्तृत्व जगाला आदर्श नी प्रेरणा देणारे असते..

   स्वतःला ओळखणारी व्यक्ती च जगात ओळख निर्माण करू शकते.म्हणून माणसाने स्वतःला नी जगाला ओळखायला शिकले पाहिजे तुम्ही कोण फसवत आहे नी कोण तुमचा गैरफायदा घेत आहे हे देखील ओळखणे आवश्यक असते. जगात जे चांगले वाईट आहे त्याची ओळख नी जाण तुम्हाला असली पाहिजे.. आपल्या जिद्दीच्या, बुद्धीच्या नी कर्तृत्वाच्या जोरावर आपण जग मुठीत घेऊ शकतो . तुम्ही स्वतःला नी जगाला ओळखणे यासाठी ची आवश्यक असते... तुम्ही जगाला ओळखायला शिका,चुकू नका...तुमची खरी ओळख तुम्ही जगाला करून दिली पाहिजे... असे महान कार्य तुमच्या हातून होणे आवश्यक आहे...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract