संस्कारांची गरज आहे
संस्कारांची गरज आहे
संस्कारांची गरज आहे... डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, 'शिक्षणापेक्षा अधिक किंमत शीला ची आहे.' शील म्हणजे चारित्र्य... म्हणून च म्हटले जाते 'Character is lost everything is lost...' चारित्र्य गमावणे म्हणजे सर्व काही गमावणे आहे.चारित्र्यहनन हे सर्वात वाईट असून, चारित्र्य हनन झालेला माणूस माणूस म्हणून जगूच शकत नाही , त्यामुळे च ' चारित्र्याचा विकास घडवते तेच खरे शिक्षण ' असे म्हटले जाते.यावरुनच शील म्हणजेच चारित्र्याची नी त्यासाठी आवश्यक असलेल्या संस्कारांची महती लक्षात येते... मातृ देवो भव,पितृ देवो भव,नी आचार्य देवो भव!म्हणणारा काळ संपला असंच म्हणावं लागेल... नात्याबद्दल बोलायचे म्हटले तर कोणतं च नातं खरं राहिले नाही... रक्ताच्या नात्यात ही भेसळ झाली की काय असं च म्हणायची वेळ आली आहे... जन्म देवून दुनिया दाखवणाऱ्या आईबापांना आईबाप न म्हणणारी औलाद इथे जन्माला येत आहे.कोणतच नातं इथं खरं दिसत नाही.आईला बाळ नी बाळाला आई समजत नाही... इतर नात्याच तर सोडून बोला... संस्कार नी शिक्षण देणारा शिक्षक ही शिक्षक राहिला नाही. सांगायच काय तर घडू नये ते घडतंय एवढं मात्र नक्की... म्हणून च ह्या युगाला कलीयुग म्हटले जाते... खरं काय नी खोटं काय हेच ओळखणे कठीण झाले असून सर्व शिकवण नी मूल्य धुळीस मिळाली आहेत...सत्य, न्याय, नितीमत्ता संपून , हिंसा, अनैतिकता, पापाचे ओझे वाढत आहे... शेतकरी,मजुरांचे नाही पण शिकलेल्या चे आईबाप वृध्दाश्रम बेवारस रहात असून ते तिथेच मरत आहेत... वृध्द, आजारी आई बापाला कोणी बघत च नाहीत पण मेल्यावर ही अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी मुलं मुली येत नाहीत... बेवारसासारखं अंतिम संस्कार चंदा जमा करून करावं लागतं आहेत...आजच वाचायला मिळाले आठ मुलीच्या समोरुन आईची अंत्ययात्रा गेली पण एकही मुलगी आईच्या अंत्यसंस्काराला आली नाही... मुलं, मुली,सुना नोकरीला बाहेर वृध्द, आजारी आईवडील यांना कोणी पहात नाहीत,साधा फोन ही करत नाही,त्यांचा जीव गेला तरी कोणी विचारत नाही.मी तर म्हणेन आपल्या आईवडिलांशी आपण कसा व्यवहार करतो हे आपले लेकरं पहात आहेत नंतर त्यांच्या पेक्षा वाईट हाल आपले होणार आहेत... संस्कारांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती,मान, सन्मान,आदर, सेवा, सुश्रूष्या, संस्कार, आपोआपच घडायचे, आता लेकरं पाळणाघरात मोठे होत आहेत नी आईबाप वृध्दाश्रमात मरत आहेत म्हणून संस्काराचे मोल लक्षात घ्या, योग्य वेळी योग्य संस्कार झालेच पाहिजेत, संस्कारांची जबाबदारी आईवडील, नातेवाईक,मित्र, शिक्षक म्हणजेच, कुटुंब, शाळा, सहकारी,समाजाची आहे... जेव्हा नको ते घडताना दिसतं तेव्हा समजून घ्यावे की नक्की च संस्कार कमी पडले आहेत... योग्य वेळी योग्य संस्कार करण्यात आपण कमी पडल्यामुळे च जगात पाप नी अंधार होताना दिसून येतोय...आपणच म्हणतोय हे कलीयूग आहे... संस्कार अनमोल असून माणूस हैवान होतोय... माणसाला माणूस घडविणारे संस्कार नी शिक्षण आवश्यक आहे हे तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेणे गरजेचे आहे... गायकवाड आर.जी.दापकेकर ९८३४२९८३१५
