STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

गाव जागा झाला

गाव जागा झाला

1 min
8

विकास म्हणजे काय

कळू लागले प्रत्येकाला,

अन् खरंच दादा माझा

गाव जागा झाला...


दूर झाले भांडण तंटे

सारे भेदभाव,

बंधुभावाने नांदतो

सारा माझा गाव...

प्रत्येकाचा हातभार आहे

गावाच्या विकासाला...

    अन् खरंच दादा माझा गाव जागा झाला...


झटू लागले सारे

घेऊन विकासाचा ध्यास,

गावाला आले माझ्या

खरंच चांगले दिवस,

हवं आपलं योगदान

वाटू लागले प्रत्येकाला...

  अन् खरंच दादा माझा गाव जागा झाला...


एकीने सारेच

पुढे सरसावले,

शक्य सारं करुन

युवकांनी दावले,

मागं नाही कोणी

प्रत्येक जण पुढे आला...

  अन् खरंच दादा माझा गाव जागा झाला...


लाईट, रस्ते, नाल्या, पाणी

वृक्षारोपण झाले,

मोठमोठे अधीकारी

गावात धाऊन आले,

संकल्प गावाच्या विकासाचा

साऱ्यांनीच केला...

  अन् खरंच दादा माझा गाव जागा झाला...


तंटामुक्ती, व्यसनमुक्ती

गाव हागणदारीमुक्त होणार,

स्वच्छ, सुंदर गाव आमचा

आदर्श जगाला देणार,

राजाचं हे गाव आमचं

आहे अभिमान आम्हाला...

  अन् खरंच दादा माझा गाव जागा झाला...


जात, पात, धर्म

नाही कोणता भेदभाव,

अभिमान मज आहे 

खरंच आदर्श माझा गाव,

ओढ लागली विकासाची

लाभले नेतृत्व छान गावाला...

..... अन् खरंच दादा माझा

गाव जागा झाला....


दाखवून देवू जगाला

चला पुढे नेऊ गावाला 

संकल्प विकासाचा

एकजुटीने आहे केला.

भल्यांबुऱ्यांची जाण आता

झाली या तरुणाईला...

  अन् खरंच दादा माझा

गाव जागा झाला...


आरोग्याचा मंत्र देवू

घेऊ नवा वसा,

संत नामदेव कृपा झाली

जाग रे माणसा,

 पाय नाही ओढायचे कोणी

या रे संगतीला...

   अन् खरंच दादा माझा गाव जागा झाला...


राजाचं हे दापका गाव

गावाचं मोठं नाव,

नांदतो नियतीने, सुखाने 

संतकृपा, भक्तीभाव.

संत नामदेव चरण स्पर्शाने

माझा गाव पावन झाला...

    अन् खरंच माझ्या गावाचे आले भाग्य उदयाला...


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract