STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

माणूस हिच जात नी मानवता हाच धर्म

माणूस हिच जात नी मानवता हाच धर्म

3 mins
5

*माणूस हिच जात नी मानवता हाच धर्म* माणूस आपल्या नावासमोर आपल्या वडिलांचे नाव लावतो. म्हणजे आपली ओळख आपल्या वडिलांच्या नावाने होते. आपण कोण ? तर....यांचा मुलगा ही आपली ओळख.माणूस आपली ओळख सांगण्यासाठी वडिलांच्या नावाचा वापर करतो.आपण कोण हे सांगण्यासाठी आपल्या वडिलांचे नाव सांगणे एवढं ठिक आहे पण आपली जात, धर्म ही आपल्या ओळखीच्या दृष्टीने काही महत्त्वाची नाही... जात आणि धर्म माणसाच्या दृष्टीने मुळीच महत्वाचे नाहीत पण आजचा माणूस महत्व नसलेल्या याच गोष्टीना जास्तीचे महत्त्व देताना दिसत आहे... खरं पाहता ' माणूस ' हीच आपली ओळख पुरेशी आहे ' माणूस ' हिच' जात 'असेल तर ' मानवता ' हाच आपला धर्म.आज काल जात नी धर्मांला जास्तीचे महत्त्व दिले जात असून या मागे खूप मोठे राजकारण आहे.मी ह्या जातीचा तर तो कोणत्या जातीचा असेल? त्यांचा धर्म कोणता असेल? त्याची नी आपली जात, धर्म एकच असेल का? दोघांची जात वा धर्म एकच असेल तर दोघेही एकच... किती नी का ? एवढे महत्त्व या जात नी धर्मांला? काय गरज या जातीची नी धर्मांची ? जात नी धर्म ह्यावरून माणसाची ओळख नकोच . तुमच्या ओळखीसाठी तुमचे नी तुमच्या वडिलांचे म्हणजेच बापाचे नाव पुरे झाले...आपला बाप हिच आपली ओळख बाकी कोणाची जात काय नी कोणाचा धर्म कोणता यांच्याशी काही ही देणे घेणे नाही पण यातही राजकारण आहे... मुळात जात नाही ती जात.असे जरी म्हटले तर आपण जात घालवू शकतो.या राजकारण्यांनी या जात नी धर्मांला जास्तीचे खत पाणी घातले आहे.राजकिय दृष्टीकोनातून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नी निवडून येण्यासाठी,मतांची गणित मांडून जात, धर्माच्या नावाखाली मी तुमचा , तुम्ही माझे,तुमचे मत मलाच म्हणजे विजय आपलाच म्हणजे च आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा... हे राजकारण्यांनी मनावर बिंबवले... सामान्य माणसासाठी त्याचं जीवन, जगणं महत्वाचे आहे. तितकं महत्वाचे या राजकारण्यांना त्यांची खुर्ची, त्यांचं पद,त्यांचा विजय महत्वाचा आहे.या विजयासाठी,पद, खुर्ची, राजकारणासाठी राजकारण्यांनी स्वताच्या मतांची गणित मांडताना जात नी धर्म ह्याचा खेळ मांडला आहे .कार्यक्रम, मोर्चा,सभा, उद्घाटन, योजना, जात नी धर्म विचारात घेऊन आखले गेले त्यामुळे लोकांच्या डोक्यात राजकारण्यांनी जात नी धर्म जास्तीच भरवला, यातूनच मग दहीहंडी, गणेशोत्सव, दुर्गा पुजन, दांडीया, इफ्तार पार्टी,उरुस,यात्रा, सप्ताह या सारखे धार्मिक गोष्टींना महत्त्व दिले जाऊ लागले, हिरवा, भगवा, निळा, पिवळा, गुलाबी असे रंग निर्माण झाले नी जाती , धर्मानुसार, आयोजन व्हायला लागले, मोर्चा, सभा कार्यक्रम जाती , धर्म लक्षात घेऊन व्हायला लागले नी झेंडे, फोटो, महापुरुषांच्या वाटण्या झाल्या. माणूस आपली ओळख आपला बाप हे विसरून मी ह्या जातीचा नी ह्या धर्माचा,हा आमचा आमदार, मंत्री, खासदार असं बोलू लागला... त्यापेक्षा तुमचे ज्ञान,तुमची विद्वत्ता,तुमचे आचरण, कार्य, कर्तृत्व, शिक्षण, व्यवसाय, गुण, आदर्श,पद यावरून आपण आपली ओळख निर्माण करायला हवी... परीवर्तन, शिक्षण आणि संघटन, या बरोबरच बंधुता जोपासून आपण समतेचा जागर करायला हवा हे सारं सोडून केवळ स्वार्थ नी स्वार्थ भावनेने माणूस जात नी धर्म आपली ओळख सांगत सुटला आहे... जात नी धर्म ही माणसाची ओळख नसून, कार्य, कर्तृत्व, विचार, आचरण, शिक्षण, ज्ञान, विद्वत्ता, गुण, व्यवसाय,आदर्श यातून माणसाने आपली ओळख निर्माण करायला हवी... माणसाच्या डोक्यात जाती , धर्माचे भूत अधिकच घुसवले असून ते वेळीच बाहेर काढायला हवे .जाती , धर्माचे भूत डोक्यातून निघालेला माणूस नको त्या व्यर्थ गोष्टींना कधीच महत्त्व देणार नाही...तो उच्च विचारसरणीचा नी महापुरुषांच्या विचारांचा खरा अनुयायी बनेल आणि जगाला सांगेल की,' माणूस' हिच माझी जात नी ' मानवता ' हाच माझा धर्म...हाच विचार आपण अंगीकारला तर 'वसुधैव कुटुंबकम ' हे म्हणणे सार्थ ठरेल... व्यक्ती , समाज, राष्ट्र,नी पर्यायाने विश्वाचे कल्याण होईल...मला स्वतःला स्वतः पासून सुरुवात करावी लागेल नी सांगावे लागेल ' *माणूस* ' हिच माझी जात नी ' *मानवता* ' हाच माझा धर्म गायकवाड आर.जी.दापकेकर ९८३४२९८३१५


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract