" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

2  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

आई ... आईच असते...

आई ... आईच असते...

2 mins
27


आई ...आईच असते...!


आई...आईच असते...! जन्म देणारी... दुनिया दावणारी...आई म्हणजे ईश्वराचे दुसरे रूप... नव्हे आई म्हणजे ईश्वरच...!


   आपली खरी दुनिया असते ती आई...आपण म्हणजे आईचा प्राण...तीचा जीव... तिच्या काळजाचा तुकडा...तिचे जीवन...तिचा .. श्वास...तिचे सर्वस्व..तिचे विश्व...नी आपलेही...!

   आई म्हणजे आईच...आई साठी दुसरा शब्दच नाही...आईची कुठली व्याख्या सुध्दा करता येत नाही... आकाश,सागर,धरती या सारख्या सर्व उपमा आईसाठी अधुऱ्या आहेत... एका शब्दात... एका व्याख्येत आई कशी व्यक्त करता येईल... आईला उपमा देणे म्हणजे आई समजण्यात चूक झाली हेच दाखवून देणे होई...

   पेन नी कागदावर मावेल एवढी छोटी आई नसते...आपण तिचे विश्व नी आई आपले विश्व असते...

   नऊ महिने नऊ दिवस तिच्या उदरात आपण असतो नी तिला आतुरता असते आपण या जगात येण्याची... आपल्या जन्माची... जन्माबरोबर आपल्या टॅ.. टॅ ..टॅ..रडण्याचा आवाज ऐकून ही सर्व प्रसुती वेदना विसरून सुखी होणारी आई आईच असते... जन्माबरोबर बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर नाही आला तर आई जीव सोडून देते...!

  आई काय करते यापेक्षा काय करत नाही ते विचारा किंवा सांगा...ती जगते नी भोगते ते फक्त नी फक्त आपल्यासाठी...! आईचे ॠण नी उपकार ना जगून ना मरुन फिटणारे नसतात...

   आई आजारी असणं किंवा म्हातारी होणं नी आपण तिला आपल्या हाताने खाऊपिऊ घालणे, भरवणे तीची सेवा सुश्रुषा करणे हे लाभणे हे सुद्धा आपण आपले भाग्यच समजावे...आपण तिची किती जरी काळजी घेतली किती जरी सेवा केली तरी कमीच कारण आपण ह्या जगात असतो ते आईमुळेच...

    आईचा मृत्यू... बापरे... सर्व संपलेच म्हणून समजा... तुम्हाला दुनिया दावणारीच निघून गेल्यावर या दुनियेत आपले उरतेच तरी काय... म्हणून आपली दुनिया असते आई... आईबापांना जपावे... मुळीच दुखवू नये..त्यांची तुम्ही किती जरी सेवा सुश्रुषा केली तरी ती कमीच... आईबापांची सेवा ही संधी नी भाग्य समजावे... ज्यांना आईबाबांच्या सेवेची संधी मिळाली नाही... किंवा करू शकले नाही त्यांचे दूर्भाग्यच... दुनियेत देव आहे का नाही हे बघत बसण्यापेक्षा खऱ्या देवाची आईवडिलांची सेवा मनापासून करा... आईवडिलांनी दिलेला आशीर्वाद म्हणजे न संपणारी जन्माची शिदोरी आहे...


"आई न दिसे दुनियेत

अश्रू येती नयनात,

आईच होती दुनिया

बुडाला शोक सागरात..."


" शोधू कुठे कुठे मी

सांग तुच आई ,

पुसणारे अश्रू डोळ्यातील

दुनियेत कोणीच नाही..."


"होतीस तू दुनियेत

कळले न तुझे मोल,

तू गेल्यावरच कळले

आई तू किती अनमोल..."


" जगलीस माझ्यासाठी

आई तू माझ्यासाठी मेलीस,

तुझ्या काळजाचा तुकडा

का सोडून आई गेलीस..."


गेलीस आई तू निघून 

जीवनात अंधार झाला,

येते आठवण क्षणाक्षणाला

सांग शोधू कुठे मी तुला..."


". लाभो शतदा जन्म

आई तुझ्याच पोटी,

आई तुझ्या ग चरणी

माझे वंदन कोटी कोटी.

माझे वंदन कोटी कोटी...!!!


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract