लोप पावत चालली मातृभाषा येऊ
लोप पावत चालली मातृभाषा येऊ


लोप पावत चालली मातृभाषा...
मातृभाषा लोप पावत आहे असे म्हणायला जीभ अडखळत नाही ही किती मोठी शोकांतिका आहे ? होय पण हे सत्य आहे.खरंच मातृभाषा लोप पावत आहे आणि हे सत्य असेल तर भाषेचा नाही मराठी माणसाचा फार मोठा अपमान आहे.
खरंच मराठी माणसाला आपल्या मातृ भाषेबद्दल किती अभिमान आणि ज्ञान आहे ? हाय, हॅलो,थ्याॅंक यू, प्लीज च्या जमान्यात मुलांना आईला 'आई ' नी वडीलांना 'बाबा 'म्हणायला लाज वाटत असेल नी डॅड,मॉम, म्हणून तोंड वासत असतील तर मातृभाषा टिकवणे अवघड होईल...
मातृभाषा समृद्ध होण्याऐवजी लोप पावत असेल तर ' अमृतातेही पैजा जिंके 'म्हणतो त्यांचे काय ?
इंग्रजी शाळा
सुरू परीणाम मराठी शाळा डबघाईस... व्वा! काय मातृभाषेचा अभिमान ? आजकालच्या मुलांना धड मराठी बोलता येत नाही, शब्द भांडार नी भाषा प्रभुत्व नाही फार मोठी शोकांतिका नी अपमान आहे... मातृभाषा ही राजभाषा हवी नी मातृभाषेचा अभिमान हवा.तुम्ही मातृभाषेत न बोलता इंग्रजी,हिंदी बोलण्यात धन्यता मानत असाल तर मातृभाषा लोप पावण्यास वेळ लागणार नाही.शुध्द , अस्खलित मराठी बोलता येणं हे कमीपणाचे लक्षण नाही तर ज्ञानवंताचे लक्षण आहे, तुम्ही मराठी भाषिक असाल तर तुम्हाला मराठीचा अभिमान, ज्ञान असलेच पाहिजे, तुम्ही शुद्ध, अस्खलित मराठी बोललेच पाहिजे, मराठी जपली पाहिजे अन्यथा' मातृभाषा लोप पावत चालली आहे 'असे म्हणायला ही शब्द उरणार नाहीत...