महापुरुषांच्या जयंत्या का साजरा कराव्यात
महापुरुषांच्या जयंत्या का साजरा कराव्यात
महापुरुषांच्या जयंत्या का साजऱ्या कराव्यात.... महामानव, महापुरुष हे मुळात कुठल्याही जातीधर्माचे नसतात,जात नी धर्म यांच्याशी त्यांच कांहीच देणं घेणं नसतं.त्यांना एकच धर्म असतो तो म्हणजे मानवता.त्यांच एकच कार्य असते अखील मानवजातीचे कल्याण... म्हणून च त्यांना महामानव, महापुरुष म्हटले जाते...मुळात ते त्यांच्या आचार,विचार,कर्तृत्ववाने, ज्ञान, बुध्दी, कार्याने महान झाले म्हणून त्यांचं ओळख महापुरुष म्हणून झालेली असते. त्यांचा त्याग नी सेवा महान असते.. स्वार्थ काय असतो हेच त्यांना माहीत नसते.. खरं तर स्वार्थ माणसाला पशू बनवतो.महापुरुषांनी त्यांचा,नी त्यांच्या परिवाराचा स्वतःच्या सुख दुःखाचा विचार च केलेला नसतो .त्याना हवं असतं अखिल मानवजातीचे कल्याण...दीन दलीत, बहुजन,रंजले, गांजले, दुःखीत,पिडीत त्यांच्या भल्यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचलेले असते. मुळात इष्ट तो धर्म अनिष्ट तो अधर्म.आदर्श त्यांनी त्यांच्या कार्य गुणातुन निर्माण केलेला असतो...ते त्यांचं मोठेपण, गुणगान, कार्य जगापुढे कधीच मिरवत नाहीत.. स्वतःच स्वतःला मोठे समजणारे मूर्ख असतात.ते फक्त राजकारण्यांना जमतं.कार्य न करताही श्रेय घेणं हे राजकारण झाले.. म्हणूनच महापुरुषांच्या आचार, विचार, कार्याची, मोठेपणाची, आदर्शाची, त्यांच्या ज्ञान, बुध्दी, वर्तनाची खरी ओळख समाजाला व्हावी.. त्यांचं आचरण, कार्य, वर्तन, आदर्श समाजातील प्रत्येक व्यक्तीमध्ये पहायला मिळावा.समाजाला नवी दिशा मिळावी नी समाजोन्नती, परिवर्तन, प्रगती घडावी,विश्व कल्याण व्हावे, दुष्टांचा संहार व्हावा नी माणुसकी, मानवता, समता, बंधुता, एकात्मता, शांती नी समृद्धी नांदावी हा विचार असतो . समाजात प्रत्येक गोष्टीत राजकारण दिसून येते, लोक चांगल्यांच्या नाही वाईटांच्या मार्गाने गेलेले दिसतात.. महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथी साजरी करणे हा आज एक राजकीय डाव झालेला आहे.. लोकांना नाचायला,डुलायला लावून आपला हेतू साध्य करायचे हे राजकारण झाले. स्वतःचं स्वतःचे बॅनर छापायचे, स्वतःचे फोटो लावायचे,हार, सत्कार करायचा नी करून घ्यायचा..ही कोणती जयंती? कशासाठी हे सारं ? मी मोठा, मी सर्व केलं, माझ्यामुळे सर्व घडलं, मला मोठेपण द्या यासाठी हे करता..व्हा रे महात्मे.. महापुरुषांच्या बॅनर वर महापुरुषांचा एक फोटो आणि शेकडो, हजारो हिजडे दिसतात...हो.हो.हिजडेच...वाढलेल्या,दाडी,मिशा, आणि बोकडासारखे डोक्याचे केस.. ज्यांची थोबाडं पाहू वाटत नाहीत आपली थोबाडं चौकात का लावावीत ते त्यांनीच ठरवावे... खरं महत्वाचे आहे ते आचरण, प्रत्येकाने आपले आचरण शुद्ध ठेवावे.प्रत्येकाने महापुरुषांच्या विचार नी कार्याचा वारसा जपावा,त्यांचं स्वप्न पूर्ण करावं तरच ते त्याचे खरे अनुयायी ठरतील.नुसता जयघोष करून, ढोलताशांच्या तालावर नाचणे म्हणजे जयंती नव्हे.जयतीदिनी त्या महापुरुषांच्या कार्य, विचार,त्याग, आदर्शाची ओळख आपणास झाली पाहिजे नी ते समाजप्रबोधन, परिवर्तन घडले पाहिजे... स्वतःच स्वतःचा मोठेपणा कधीही मिरवू नका.स्वताचे मूल्यमापन स्वतः करा, स्वतःचे दूर्गून स्वतः दूर करा.स्वताच्या चुकीची स्वतःच स्वतःला शिक्षा द्या,नी वेळीच स्वतःला सुधारा... खरंच हातुन भले झाले तर निश्चितच अभिमान आहे, आदर्श आहे.. स्वतःच स्वतःचा आदर्श निर्माण करा... माणूस, समाज, राष्ट्र बदललं पाहिजे.. प्रगती, परीवर्तनाची, विकासाची गरज आहे . प्रत्येकाने सदाचारी, सद्वर्तनी बनलं पाहिजे.. माणूस म्हणून वागण्याचा, जगण्याचा नी जगविण्याचा संकल्प महामानवाच्या जयंतीनिमित्त प्रत्येकाने करावा..तरच ती खरी जयंती ठरेल...तीच त्या महापुरुषांना खरी आदरांजली, श्रद्धांजली ठरेल...🙏🏻🙏🏻🌹🌹 गायकवाड रवींद्र गोविंदराव दापकेकर जि.नांदेड ९८३४२९८३१५

