Supriya Devkar

Abstract Others

3  

Supriya Devkar

Abstract Others

व्यक्त

व्यक्त

2 mins
240


माधुरी मनातल्यामनात सकाळी उठल्यापासून खुदुखुदु हसत होती सचिन तिला सारखा विचारत होता काय झालं आज चेहरा फार फुललेला आहे तुझा तशी ती नुसतीच मिश्कील हसून वळायची आणि कामाला लागायची.

सचिन खुप खोदून खोदून विचारल्यावर माधुरी त्याला म्हणाली आज तारीख काय आहे सांगशील का?

आज 22 फेब्रुवारी सचिन म्हणाला

अरेे आज आपली लव्ह एनिवर्सरी आहे तू विसरला असशीलच. सचिन म्हणाला लव्ह एनिवर्सरी हे आणि कुठलं नवीन फॅड. मी काही कुठले दिवस आठवणीत ठेवत नसतो तुझं बर आहे घरात बसून असले काहीतरी कुटाणे करत असतेस

माधुरीला एकूूणच सचिनचा खूप राग आला होता स्वतः काही लक्षात ठेवायचं नाही आणि दुसर्‍यानेे ठेवलं तर त्याला नाव ठेवायची हा कुठला न्याय असंं म्हणत माधुरी आपल्या दुसऱ्या कामाला लागली. प्रेम करताना खूप आणाभाका घेणारा सचिन तिच्या डोळ्यासमोर तरळू लागला होता . सारखं उगाचच मागे मागेे फिरायचं सतत फोन करून गोड गोड बोलायचा. या गोष्टींचा आठवून आठवून माधुरीला राग यायचा. 

कधी फिरायला सोबत चल म्हणणारी माधुरी त्याला घरकाम करणारी गृहिणी जास्त वाटायची. पूर्वीसारखी नाजुका माधुरी आता अंगापिंडाने सुधारलेली होती कामात कधीच मागे नसायची पण त्याचा माधुरीचा सचिन आता सतत राग राग करायचा. छोट्या मुलासोबत खेळत असणारी माधुरी त्याला आपलीशी वाटेनाशी झाली होती .माधुरीला आपल्याबद्दल प्रेम वाटत नाही असं सचिनला सारखं वाटू लागलं होतं आणि म्हणूनच तो सतत तिच्यावर चिडचिड करत होता.

माधुरी मात्र एकनिष्ठ होती तिला आपलं प्रेम व्यक्त करता येत नव्हतंं का असं काही नव्हतं कारण सचिन नेच पुढाकार घेऊन माधुरी पुढे आपलंं प्रेम व्यक्त केलं होतं

माधुरी च्या घरी जाऊन तिच्या आई-वडिलांशी बोलणंं करायचं धाडसही त्यांन स्वतः केलं होतं त्यामुळे सचिन बद्दल तिला आदर होताच मात्र मुलाच्या जबाबदारीमुळे काही स आपलं प्रेम तिला वाटावं लागत होतं त्यामुळेच की काय सचिन ला थोडं वेगळं वेगळं वाटत होतं

आजही दोघातील प्रेम तितकच निखळ आणि सुंदर होतं 

मात्र दोघांना ही ते व्यक्त करता येत नव्हत. 



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract