वर्तमान पत्र
वर्तमान पत्र
लहानपणी माझी तीसरी शिकलेली आई वर्तमान पत्र तिच्या मराठी भाषेत पेपर वाले आले का? पेपर टाकला का ?असे अगदी ऊतावीळ पणे विचारायची जरी रोजच्या प्रमाणे सकाळी वेळतच येई ( क्वचित अपवादात्मक स्थिती व सुटी सोडून ) तरीही तिला का इतकी घाई असते हे आम्हाला कळायला मार्ग नव्हता बर पेपर काय वाचायचाय?नि कशाला?ती वाचतेय ना!खरे तर पेपरच बील साठ किंवा सत्तर आठवत नाही पंरतु शंभरच्या आतच आसावे तेव्हडेही देण्याजोगी परीस्थिती न्हवती आमची पंरतु आईच्या म्हणजेच आमच्या काकुच्या वाचनाच्या आवडीपुढे परीस्थितीने हार खाल्ली नाही. बर ती पेपर आला की पहीला नीट हाती घेऊन जवळ जवळपास कुरवाळत व दुर ठेवी दुपारी घरातली कामे ऊरकली की नवाकोरा पेपर ऊघडून अक्षर अक्षर वाचुन काढी मला आठवतयं अवघड शब्दही ती अडखळत का होइना वाचुन काढी.इथपर्यंत ठीक!पंरतु कधी कधी ती आमच्या वर घसरायची तेव्हा मात्र कहरच वाटायचा बाजुला बसवून ती मुख्य बातम्या किंवा हेडलाईन्स वाचायला लावीत असे पहीली दुसरीच वय काय वाचता येणार?पंरतु तीच्या समोर येत नाही वाचत नाही हे म्हणण्याची हिम्मत व सोय नाही फुकटचे दनके कोण खाणार?काकु काय असत ग इतकं पेपर वाचायचं तेव्हा तीच ऊत्तर पेपरमुळ आपल्याला जगात काय चाललय समजत कुठे कसे लोक आहेत काय करतात नेते पूढारी आपला देश कोण कस चालवतो हे सगळे पेपरमुळच समजत.थोडक्यात काय पेपर मुळ आपल्याला दुनियादारीत काय घडतय ते कळतय म्हणून पेपर वाचणे चांगले असते.त्यासाठी तीस वर्षांपूर्वी माझ्या काकूने सुरू केलेला आजतागायत सुरू आहे आणि पेपर टाकणारे काकाही तेच आहेत.आता जरा थकलेत मात्र उत्साह कायम तसाच जो मी लहानपणापासून पहात आले वयोमानाने शरीरीक चपळता कमी झालीय पंरतु न थकता व अडीअडचणी समजुन घेऊन कधिही बंद न केलेला पेपरचा रतीब ऊदा मध्यंतरी आजारपणात पेपर बंद करायला लावूनही सहा महीने कसलेही बील न देता पेपर टाकणारया काकांनी सावकाश दे ग पैसे ताई !इतकी वर्ष मी पेपर टाकतोय बुडणार नाहीत पैसे!असे ऐकविले तेव्हा खरच भरून आले.असो खरोखर माझ्या आई सारख्या अडाणी अशिक्षित बाईला वर्तमान पत्राच महत्व त्या काळात ऊमजल म्हणजे नक्कीच वर्तमान पत्र खास असावे असे पुढे समजू लागले आजच्या इतका माध्यमांचा सुळसुळाट पुर्वी कुठ होता जगाविषयी संवाद साधायला वर्तमान पत्र व रेडीओ ही दोन सशक्त माध्यम होती.आपल्या अजुबाजुला अगदीच जगाचे नाही पंरतु आपल्या देशातील कला क्रीडा व राजकीय घडामोडीची माहीती देणारा मुख्य स्रोत व एकादी दुर्मीळ वा मोठी घटना घडली की वर्तमान पत्र विकणाऱ्या व्यक्तिला एका हातात वर्तमान पत्र धरून जोरजोरात ओडडून बातमी सांगावी लागे हो! मी सुद्धा ऐंकलय स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा असे ओरडत बादशाहीच्या बोळात असलेलया आमच्या मनपाच्या शाळा क्रमांक तेहतीस मध्ये मी पहीली कींवा दुसरीत शिकत असावी त्यावेळी शाळा मुख्य टिळक रोडला लागुन असल्या मुळे बर्याचदा वर्तमानपत्र वाल्याचा आवाज वर्गात येई असेच दुसरे गाजलेले प्रकरण जककल, सुतार या टोळीने सुभाषनगर मध्ये एकाच वेळेस दोन कुटुंबाचा केलेला खुन होय तेव्हा इतकी समज नव्हतीच पंरतु घरात अजुबाजुला दबक्या आवाजातील चर्चा त्यानंतर कीतकतरी दिवस शाळेतील बांईनी घरी नीट जावा !गटागटाने जा! एसपी मध्ये आंबे चिंचा गोळा करत हुंदडू नकां असे चारचारदा बजावलेलं हे पक्क लक्षात राहील.तात्पर्य की वर्तमान पत्रामुळेच सजग रहायची सवय लागली अगदी लहानपणापासून.व्यक्त होण कधीही चांगलेच आपल्या मनातली खदखद व समाजात खटकणारया सलणारया गोष्टी बोलण्यात लोकांना कळाव्या म्हणुनच वर्तमान पत्राचा जन्म झाला असावा खरेतर यासाठी बंडखोर सडेतोड वृत्ती असावी लागते माझे मत आहे बाळशास्त्री जांभेकरानी वर्तमानपत्राचा पाया रचला म्हणायला हरकत नाही डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचे मुकनायक म.फुलेंचे सत्यशोधक टिळकांचे केसरी हे अशाच धगीतुन स्थापन झाले असावे समाजातील अनिष्ट प्रथा चालीरीती रूढी अंधश्रद्धा यावर परखड विचार फुलयांनी सत्यशोधक मधून मांडले तसेच आंबेडकर यांनी समाजातील दलीत पिढीत हजारो वर्ष गुलामीत मूक बनुन राहिलेल्या समाजाविषयी मत मांडली टिळक आगरकर यांनी इंग्रज सरकार विरूद्ध लीहीले अशा प्रकारे समाज जागृतीचा प्रखर परखड व्यापक विचार फक्त वर्तमान पत्रच पुर्वीपासुन मांडत आली आहेत असे म्हणने वावगे ठरणार नाही ज्यांना काही वर्षापुर्वी पर्यंत पर्याय नव्हता. आज मात्र जग फार पुढे आले एकविसाव्या शतकाच्या अधुनिक काळात इलेक्ट्रीक माध्यमांचा कहर झालाय लोक या जगाशीच काय दुसर्या ग्रहाच्या ही संपर्कात रहातील इतकी सशक्त क्रांती झाली आहे टिव्हीचे स्वरूप काळानुसार बदलले पूर्वी सकाळ संध्याकाळीच दूरदर्शन वर असलेल्या बातम्यांनी आता ब्रेकींग न्यूजचे भयंकर कर्कश रूप धारण केले आहे. हजारो चेनलची जगाच्या एका टोकाला काय झालेय ते संपूर्ण जगाला काही सेकंदात कळविण्यासाठी चढाओढ लागलेली असते.जी बातमी आपल्याला दुसर्या दीवशीचया वर्तमानपत्रात सविस्तर वाचायला मिळेल ती काही सेकंदात आपल्याला समजलेली असते म्हणून काय वर्तमानपत्राचे महत्त्व कमी झालेय का?नककीच नाही.मी ही सुपरफास्ट जगातच वावरते तरीही पुढारी मध्ये माझे पहिल्यांदा दोन वेळेस लेख छापून आले तेव्हा माझा आंनद गगनात मावत नव्हता आणि आज आई असती तर सर्व बातम्या अगदी रेघ ना रेघ वाचुन काढताना माझे नाव वाचताना तिला किती आनंद झाला असता मी तिला लहानपणासारखी न अडखळता करारीपणाने तितक्याच तडफडीत तळमळीने लिहीलेलया लेखाची हेडलाईन ऐकविली असती तेव्हा तिच्या भावना काय असत्या ?असा विचार मनात येऊन डोळेही पानावले होते.जिच्या मुळेच वर्तमान पत्र मुखपृष्ठापासून अगदी शेवटच्या पुरवणी पर्यंत अक्षर ना अक्षर वाचायची सवय लागली ती आजतागायत टिकली समाजातील विद्वान, साहित्यिक संपादक नेते इ.चे लेख असोत वा राशिभविष्य पासुन सुविचार विनोद असोत अथवा वाचकांचे व्यासपीठ व अलीकडेच स्त्रीयांसाठीची विशेष लेखमालिका असो अरोग्य, आहार, शारीरीक मानसिक, आजार, व्यायाम वृद्धाचे, लहान मुलांचे पौगंडावस्थेतील बदल लग्न घटस्फोटा पासुन एकाकी रहाण्याच्या समस्या पर्यंत व विविध सामाजिक राजकीय सिनेमा जगत खेळ इ.क्षेत्रातले अभ्यासू विवेचन जर समजायचे असेल तर आजही वर्तमान पत्राशिवाय गत्यंतर नाही... गेली तेरा वर्ष मी टिव्ही पहाणे सोडलेय मात्र वर्तमान पत्र नियमित वाचन करायची सवय कायम आहे आता हातातील मोबाईलसह ,दुनियाँ मेरी मुठठीमे वगैरे म्हणत जग हातामध्ये घेऊन फिरतो आपण सारेच पंरतु तरीही वर्तमान पत्र टिकून आहेत ऊलट वाढतच आहेत कारण चंगळ नाठाळ पणे खोडकर व नको त्या बातम्यांना ऊत आणणारे व पत्रकारिता विकुन दलाल बनलेल्या शेकडो माध्यमातून वर्तमान पत्र काही अंशी दुर आहेत असं म्हणने अतिशयोक्ती ठरणार नाही व ठरूही नयेत भविष्यात तही चोखंदळ सजग परखड व सत्य समाजापुढे मांडताना वर्तमान पत्राने कचरू नये मिडीया असंख्य येवोत कीतीही मोठी साखळी निर्माण होवो.देत पंरतु पैसे कमविण्यासाठी चेकाळून ओरडून घसा तानुन लोकांच्या मनाचा जीवनाचा बट्ट्याबोळ केलेल्या चाटुगिरी करणार्या माधयमापेक्षा जास्त टिकावू सत्य अंतिम आहे सामाजिक भान टिकवून असलेले लढावू वर्तमानपत्रा अजुनही आपली पत टिकवून आहेत. समाजात जी चोहोबाजूंनी विविध उपक्रम व क्षेत्रातील ज्ञानाचे भांडार वाचकांसाठी खुले करतात ऊद्याचे जग आजच्या पेक्षा जास्त पुढारलेले असेल मानुस माणसापासून दुरावलेला आहे मोबाइल टिव्ही कंप्युटर स्पेस शटल रोबोटिक इ.गोष्टी नी व्यापलेल्या दुनियेत भावनांना स्थान नाहीच पंरतु कोरया करकरीत वर्तमान पत्राचे पहीले पान ऊलगडलयावर येणारा जो सुवास आहे तो आजही बालपणी शाळेत भेटलेली पुस्तकं ऊघडलयावर येणार्या वासाची आठवण करून दिल्याशिवाय रहात न व्यक्त केलेल्या विचारांना वर्तमान पत्रात दुसर्याच दिवशी छापलेले पाहून होणारा आनंद मी शब्दात नाही मांडू शकत कारण माझ्या शब्दातील भावनांचा ओलावा वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी संपादकांनी अर्थात वृत्त पत्राने प्रकाशकादवारे मदत केलेली असते.चांगले विचार हा मनाचा आरसा असतो तो समाजाला दाखवून देणारी वृत्तपत्र समाजाचा आरसा असते जो कायम स्वच्छ ठळक व खरा खुरा निर्भय निर्भीड असावा लाच भय दलाली व हुकमतीचा बांधिल ताबेदार मुखवटा किमान वृत्त पत्राने तरी चेहेऱ्यावर चढवू नये समाज मनाचा हा आरसा भविष्यात ही सत्य दाखवून समाज जागृतीचे कार्य बाणेदार पणे करीतच राहील अशी अपेक्षा.
