Pratibha Chandurkar

Abstract

3  

Pratibha Chandurkar

Abstract

वो बात ( विषय..विवाह)

वो बात ( विषय..विवाह)

3 mins
149


" अग..मुलगा खूप चांगला आहे. भेटायला काय हरकत आहे.." रुपाली सईला समजावत होती.

" आई..मी अजून दोन वर्ष लग्न करणार नाही. मला अजून एक परीक्षा द्यायची आहे प्रमोशन साठी" सई बोलली. सई मोठ्या मल्टी नॅशनल कंपनीत काम करत होती. पोस्ट, पगार सगळ चांगल होत. पण तिला लग्न करायचं न्हवत अजून. 

खर तर प्रमोशन हा एक बहाणा होता. अजून तिला तिच्या मनात भरेल अशी कोणीही व्यक्ती भेटली न्हवती. रुपालीच्या तिच्या आईच्या आग्रहाखातर दहा जणांना भेटून झालं होत. मनात जी " वो बात" अस असत ना, तस कोणी भेटल न्हवत.

आणि मग भेटी झाल्या की त्या मुलात काय कमी आहे. सगळ तर चांगल आहे. अजून काय अपेक्षा आहेत तुझ्या वैगरे चर्चा तर होतच होती. त्या बरोबर आजकालच्या मुलांशी कस वागावं ही जागतिक समस्या तर सर्व आई वडलांना वाटते तशीच सईच्या आई वडलांना वाटत होती.

म्हणून सईने ठरवल, सध्या काहीच नको. प्रमोशनच नाव सांगून स्वस्थ बसू या.

पण रुपाली कसली ऐकतीये. सई आता ३२ वर्षाची होणार, पुढच्या महिन्यात. किती दिवस थांबायचं. उलट उशीरच झालाय. पुढे अजून समस्या वाढतात. मुल, बाळ झाली की वाढवताना त्रास होतो. रुपालीची पुढची सगळी कॅलक्युलेशन सुरू होती. 

सईला ही कळत नव्हतं की कस समजावून सांगावं आईला.

" मी नाही ह भेटणार. एकदाच सांगते आई..प्लीज.." अस म्हणून सई ने तो विषय संपवला.

पण आत्तापर्यंत आलेल्या सर्व मुलात हा मुलगा चांगला आहे हे रुपालीला कळत होत. आणि तिच्या मैत्रिणीच्या नातातल्या होता. त्यामुळे घरचं ही सगळ नीट माहीत होत. 

एक तर तिची आणि वैशालीची भेटच पंधरा वर्षांनी झाली होती. दुसऱ्या एका मैत्रिणीच्या लग्नात. सगळच अचानक घडल. रुपालीच्या मंडळात मिता देवधर म्हणून मैत्रीण होती. तिच्या मुलाच्या लग्नात अचानक वैशाली भेटली. मिताने ओळख करून दिली. माझी चुलत नणंद करून.आणि दोघी एकमेकींच्या कडे बघून ओरडल्या " तू " अस करत. मिता मैत्रीण असली तरी एवढी घसट न्हवती दोघींच्या मध्ये. मिता कायम एक अंतर राखून असायची. त्यामुळे तिच्या घरची माहिती कमीच होती रुपालीला..त्यामुळे वैशाली ला बघून तिला आनंदच झाला. 

मग काय सगळ्या विचारायला लागल्या. तुमची ओळख कशी वैगरे. कल्याण मधल्या एकाच शाळेत , एकाच इयत्तेत, एकाच वर्गात शिकणाऱ्या दोघी. मग काय लहानपणचे किस्से सुरू ..सगळ्या म्हणाल्या "आता ह्या दोघी गेल्या कामातून. बडबड करत बसतील आता."

फोन नंबर शेअर केले दोघींनी. रुपालीने वैशालीला घरी बोलावलं. तिथे तिने तिच्या मामे भावाच्या मुलाबद्दल सांगितल. विनय त्याच नाव. खरच, सगळ छान होत. 

" नाहीच भेटायचं म्हणते ग सई.." रुपाली वैशाली ला फोनवर सांगत होती. 

" ठीक आहे. काहीतरी आयडिया केली पाहिजे. बघू या.." अस म्हणत तीने फोन ठेवला. 

दोन दिवसानंतर रुपाली म्हणाली, " बाहेर जेवायला जाऊ या का आज? तेवढाच चेंज.." 

" येस..चल ..जाऊ या. द्वारका मध्ये जाऊ या. " सई खूष होत म्हणाली.

हॉटेलमध्ये जायला तिला फार आवडत हे रुपालीला माहीत होतच.

सगळे द्वारकात पोचले. कोपऱ्यात टेबल बघून तिथली जागा घेतली. काय मागवायच, वैगरे चर्चा सुरू असताना, रुपालीला भेटायला कोणीतरी मैत्रीण आली. " अय्या..तू इथे कशी? " अस बोलण झाल. 

मग आम्हीही सगळे आज इथे जेवायला आलोत वैगरे बडबड झाली. " तुम्ही ही जॉईन व्हा ना." अस वैशाली बोलली.

सई जरा घुश्यातच जॉईन झाली त्यांना. विनय ही होता. वैशालीने ओळख करून दिली. सई आणि विनयची ओळख झाली. एकमेकांना पाहिलं आणि पाहताक्षणी जाणवलं, " वो बात है" , ज्याची आपण वाट बघत होत.

आणि एका शुभ मुहूर्तावर सई आणि विनयचा शुभ विवाह झाला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract