Pratibha Chandurkar

Abstract

3  

Pratibha Chandurkar

Abstract

खरा नायक

खरा नायक

3 mins
207


शाळेची बेल वाजली आणि रुपेश धावतच गेटमध्ये शिरला. लेट होण्याची त्याची ही तिसरी वेळ. मागच्या वेळी त्याच्या क्लास टीचरने, त्याला मुख्याध्यापिकाच्या समोर उभ केलं होत. 

त्यांनी शांत स्वरात पण कडक भाषेत सांगितल होत.." परत असा उशीर चालणार नाही. पालकांना भेटायला बोलवलं जाईल." 

" नाही होणार परत उशीर." रुपेश घाबरत बोलला.

खर तर त्याला उशीर होत होता, त्याच कारण ही योग्य होत. पण ते कारण फक्त त्याला आणि त्याच्या वडलांना माहीत होत.

रुपेशशी आजी म्हणजे वडलांची आई , त्यांच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये रहात होती. अधून मधून ती आजारी पडायची. वडलांची नोकरी फिरतीची होती.

त्यामुळे ते नसले की रुपेशला मदतीला जावं लागायचं. कधी औषध , कधी काही सामान, दुसरी कुठली मदत लागत असे आजीला.

आणि हे सगळ आईच्या नकळत करावं लागे. ह्याला कारण ही तसच होत. लग्न होऊन त्याची आई घरात आली आणि आजीची खूपच दादागिरी चालायची. सतत अपमान, घालून पाडून बोलणें..त्याचे वडील, आजोबा खूप वेळा समजवायचे. तरी काहीच सुधारणा नाही. शेवटी व्हायचं तेच झालं.

ह्या त्रासाने आजोबा गेले आणि मग रूपेशची आई फार बिथरली. आजोबा खूप सांभाळून घेत होते तिला. 

शेजारच्या बिल्डिंग मध्ये एक जागा आहे अस कळल आणि आईने हट्ट धरला.. मला तिकडे रहायला जायचं आहे..

" हे बघा. शेजारच्या बिल्डिंग मध्ये जागा आहे. फार लांब नाही. त्यांना काही लागल तर आपण जवळ आहोतच. पण आता मला इथे रहायचं नाही. " रुपेशची आई ठाम पणे बोलली. 

वडलांनी मग बाजूच्या बिल्डिंगमध्ये घर घेतल. सर्व गेल्यावर एकटेपणा उरला. रुपेशच्या आजीला काय गमावलं ते कळल. 

मनातल मळभ जायला थोडे दिवस तर लागतातच. रुपेशचे वडील ही कितीही नाही म्हणल तरी वेगळे झाल्यावर थोडे रिलॅक्स झाले. सतत तक्रारी ऐकून त्यांना ही कंटाळा आला होता. 

काही असल तरी रूपेशच्या ह्या नव्या घरात आनंद भरला होता आणि आजीच घर मात्र निराशेने भरल होत.

तिला वाटत होत, आपण कसही वागलो तरी आपला लेक आपल्या पासून लांब जाणार नाही. हा भ्रम होता. आपण वेळीच नीट वागायला पाहिजे होत, हे उशिरा लक्षात आल. पण आता हे एकटेपण सोसणे भाग होत. 

रुपेशला वडलांची, आईची, आजीची समस्या कळली होती. म्हणूनच तो सर्वांचं मन राखून वागत होता आणि काम ही करत होता.

किती ही काळजी घेतली तरी व्हायचं ते होतच. परत एक दिवस रुपेशला शाळेला उशीर झाला आणि त्याच्या आईला शाळेत भेटायला बोलवण्यात आल.

" अस कस होईल? तो तर साडे अकरा वाजता घरातून निघतो. दहा मिनिटात शाळेत पोचत असेल.." रुपेशची आई म्हणाली. 

रुपेशला बोलावलं.." मला उशीर होतो कारण बाबा बाहेर गेले की मी आजीकडे तिच्या मदतीला जातो कधी कधी. मग तिथे उशीर झाला की शाळेत उशीर होतो. "

मुख्याध्यापक रूपेशच्या आईकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत होत्या. 

त्याची आई स्वतः ला सावरत म्हणाली, " परत नाही होणार अस मॅडम. मी खात्री देते. "

" ठीक आहे. "अस त्या म्हणाल्या.

घरी आल्यावर रुपेश आईला बोलला., " सॉरी आई. मी तुला हे सांगितल नाही, तू रागावशील म्हणून. बाबांना मदत म्हणून मी अस करतो. तू आजीला अजूनही माफ केल नाहीस . तुम्ही मोठे लोक आम्हाला सांगता, की माफ करा, सोडून द्या. पण प्रत्यक्षात तुम्ही तस करत नाही. मग आम्ही नक्की कुठला आदर्श घ्यायचा? " 

रुपेशच्या आईचे डोळे खाडकन उघडले.

" चल बेटा. आत्ताच आजी कडे जाऊ या आणि हो मी जाईन ह आजीच्या मदतीला..

तूच आपल्या घरातला खरा नायक आहेस. तुझ्या वागण्यातून तू सिद्ध केलस. " 

अस म्हणत रुपेशच्या आईने त्याला प्रेमाने जवळ घेतल. 


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract