Pratibha Chandurkar

Abstract Drama

3  

Pratibha Chandurkar

Abstract Drama

धाग्या विण

धाग्या विण

2 mins
217


" धागा धागा खंड विणु या, विठ्ठल विठ्ठल मुखे म्हणू या "शारदाताईंचा नेहमीप्रमाणे अप्रत्रिम सुर लागला होता..त्यांच्या शेजारी त्यांची पाच वर्षाची चिमुकली साधना बसली होती.. आईच्या गानसाधनेला नावा प्रमाणे साथ देत..

आणि प्रेक्षक..ते तर मंत्रमुग्ध होवून, त्या विविध रंगी वसुंधरेच्या विठ्ठल रुपात रंगून गेले होते..

आणि अचानक बाहेरून आरडा ओरडा ऐकू यायला लागला..

" ए..बंद करो..बंद करो.." अस ओरडत दहा बारा मुलं.. हो खर तर मुलचं...फक्त धर्माच्या नावाने भडकवलेली...

आणि क्षणात ते सुर विरले आणि उरला भग्न मंडप..

जीव वाचवण्यासाठी सगळे पळाले आणि शारदाताई साधनाला शोधत होत्या..

" माझी लेक..माझी लेक.." असा आक्रोश करत होत्या..

त्यातल्या दोन, तीन जणांनी साधनाला उचलल..

मन लालचावल होतच..पण आयाम पुढे आला..

" खबरदार..! इसे हाथ लगाया तो.." 

त्याच्या दराऱ्याने सगळे बाजूला झाले..त्याने तिला जवळ घेतल..

" आई.." साधना हुंदके देत म्हणाली..त्याने तिला इशाऱ्याने गप्प केलं..

गपचुप तिला घेवून तो मागच्या भागात त्याच्या आजोबांच्या खोलीत गेला..प्रेमाने डाळ, भात खिलवला..

आणि रात्री सामसूम झाल्यावर , तो पुरुषी ड्रेस उतरवल्यावर साधना ने बघतल तर..तर तो ...ती होता..थोडे लांब केस, काळेभोर मोठे डोळे, आणि सैल कपड्यातून लपवलेल, तिचं अस्तित्व..साधना डोळे विस्फारून, तोंडाचा आ करत बघत राहिली..परत तिने फक्त खूण केली..आणि रात्री, दिवसा क्रूर वाटणारा तो , न्हवे ती, वेगळीच भासली..सुंदर अशी ओढणी प्रत्येक धाग्यात निगुतीने आणि सुरेख रंग संगतीने विणत असलेली एक कलाकार..

एकाच व्यक्तीची दोन रूप..साधनाच्या निरागस मनाला आणि बुद्धीलाही न झेपणारे प्रश्न..

पहाटे तिला गदागदा हलवत, " चल.. जल्दी "

अस म्हणत त्याने..नाही ,नाही तिने, साधनाला तिच्या घराच्या जवळ सोडले...तो लांब उभा राहिला..

घरात शिरताना साधनाने त्याला हळूच टाटा केला आणि " धागा जुळला, जीव फुलला, वेड्या बहिणीला भाऊ मिळाला, " हे रेडिओवरच गाणं ऐकून निरागसपणे हसत म्हणाली, " भाऊ का बहिण? "



Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract