Pratibha Chandurkar

Children

3  

Pratibha Chandurkar

Children

आकार

आकार

2 mins
128


मे महिन्याची सुट्टी लागली की दिवसभर खेळाचा सिझन सुरू व्हायचा. आंब्याचा सिझन असतो ना तसाच.

सकाळी उठल की भरफेट नाष्टा करायचा आणि मग लपालपी, पकडा पकडी असे खेळ खेळायचे. दुपारी सागर गोटे, पत्ते, कॅरम असे बैठे खेळ. संध्याकाळी लगोरी हा खेळ हमखास खेळायचा. 

आज ही लगोरी हा खेळ सुरू झाला. दोन टीम पडल्या. एकात मानस, ऋचा, संदीप, दिपक आणि बाकी टीम.

दुसऱ्यात नीलिमा, मंजू, पुष्पा, संजीव, प्रकाश आणि इतर असा ग्रुप होता.

लगोरी खेळता खेळता चेव चढला आणि संजीवने दीपकला बाद करण्यासाठी जोरात बॉल मारला. मग सुरू झालं भांडण. 

मोठे मध्ये पडले आणि भांडण मिटल. 

संजीवची बहीण मंजू त्यामुळे साहजिक तिने त्याची बाजू घेतली. दिपकच्या डोक्यात राग होता.

पंधरा दिवसांपूर्वी सर्वांनी मिळून मागच्या बाजूला झाड लावली होती. त्यात काकडीचा वेल मंजू आणि संजीव ने लावला होता आणि ते त्याची प्रेमाने देखभाल करत होते.

दोन दिवसापूर्वी काकडीला पहिलं फुल आल होत म्हणून सर्व जण आनंदात होते.

दिपकच्या डोक्यात खूप राग होता. रात्री कोणी आसपास नाही हे बघून त्याने काकडीचा वेल उपटून टाकला.

हे सर्व त्याच्या आईने खिडकीतून पाहिलं. आत्ताच त्याच्या रागाला आणि ह्या वृत्तीला आळा घातला पाहिजे हे तिच्या लक्षात आल.

दुसऱ्या दिवशी नेहमी प्रमाणे मंजू आणि संजीव काकडीच्या वेलीच फुल किती वाढल हे बघायला गेले. बघतो तर वेल उखडून टाकला होता. त्यांना रडायला आल. बाकीचे ही आले ते ही रडायला लागले.

हे सर्व बघून दीपक ही आला. मोठी माणसं जमली.

दीपकची आई बोलली, " हे बघा मुलांनो..तुमच्या भांडणाचा राग ह्या कोवळ्या फुलावर ज्यांनी कोणी काढला ते बरोबर नाही. रागाच्या भरात तुम्हीच लावलेल्या ह्या रोपाच तुम्हीच नुकसान केलं..हो ना.." 

" पण आम्ही नाही केलं." अस काही मुल बोलत होती.

" हो..हे ज्याने केलं आहे त्यालाच मी सांगते आहे. ह्या कोवळ्या रोपांने त्यांच काय बिघडवल होत..सांगा बरं." दीपक ची आई बोलली.

ते ऐकून दीपक ने तिला मिठी मारली आणि पुटपुटत सॉरी बोलला.

न दुखावता त्याला एक अमूल्य संदेश मिळाला.

मुले ही ओल्या मातीच्या गोळ्या सारखी असतात. त्याला योग्य आकार द्यावा लागतो..

समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Children