भुक
भुक


सकाळची वेळ होती. मुलांना शाळेत जायची तयारी सूरू होती. नीता आपल्या दोन्ही दोन्ही मुलांचे सई आणि अजयचे टिफीन देत भरत होती. सई आईजवळ किचनमध्ये आली. " काय ग आई , तुला सांगितल होत ना मी मला नको ग ही मेथीची भाजी, मला दुसर हव होत. पण सई आजारी पडली होती. म्हणून निताने आपल्या मुलीला डाॅक्टरांनी पालेभाजी आणि पौष्टीक आहार घ्यायला सांगितला होता. सईला पिझ्झा, बर्गर, पास्ता, नुडल्स म्हणजे जीव की प्राण... पण ती आजारी पडली होती. त्यामुळे नीतीने तिला आहाराविषयी खुप समजावून सांगितली. त्याच्यावरून सई गोंधळ घातल होती. तिच पाहून लहान असणारा अजयदेखील सई सारख वागायचा. तिच पाहून तो पालेभाज्या नको म्हणायचा. " आज तुम्ही टिफीनला ही पोळी भाजीच न्यायची आहे आणि " सई बेटा, तुला तर डाॅक्टरांनी पालेभाज्या खायला सांगितल्या ना... " सईने काही न बोलता तोंड फुगवत आपला टिफीन बॅगेत भरला. हा सगळा गोंधळ मुलांची आजी मेधाच्या कानांवर पडला. त्यांनी साईला थोडस समजावल पण मुलांना उशीर व्हायला नको, बस येईल म्हणुन त्या सईला फार बोलल्या नाहीत. नीता दोन्ही मुलांना सोडून आली.
निता शाळेतुन सोडून आली. निताला आपल्या मुलांची काळजी तिच्या चेहर्यावर सासुला दिसली. तेवढ्यात ऑफीसची तयारी करून , शशांक खाली आला. तो निताला विचारतो... " काय ग, सई कश्यावरून एवढ गोंधळ घालत होती, द्यायच ना तिला काय मागत होती. " आपल्या मुलाच बोलण ऐकून मेधाताई म्हणाल्या, " शशी, तु गप्प बस... तुझी मुलगी फास्ट फुड वगैरे मागते, ते खाऊन ती आजारी पडली होती मागच्या आठवड्यांत, तिला भाज्या नको, हे नको मला ते नको... नेहमीच सईच एकते. आज म्हटल जाऊ दे, शाळेतुन आल्यावर सांगूया... " बरोबर आहे आई तुझ " मी निघतोय मला उशीर होतोय. पण तुम्ही दोघींनी तिला सगळ समजुन सांगा. तो निघून जातो. सासुबाई निताला समजुन सांगतात. मी समजावते सईला. " हो ना आई निता म्हणते. तिच पाहून अजयही तसाच वागतो. पौष्टिक आहार शरीराला गरजेचा असतोच. मुलांच्या शारिरीक वाढ व विकासाकरता उपयुक्त आहे. ही हल्लीची मुल ना आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि बाहेरच खायला जास्त आवडत यांना. " आई, मला ना हेच कळत नाही बघा, कितीही चांगल करा, पालेभाज्या व इतरही भाज्या ही मुलगी नको म्हणते. मग कस होईल सईच... " मी समजावते तिला आज " अस सासुने म्हणताच निताची काळजी दुर होते. सासुबाई म्हणतात... " निता तुला ते बसस्टाॅपपासुन जवळ असणार रेस्टाॅरंट माहीती आहे ना.. तिथे आसपास कितीतरी लहान मुले, भिकारी ज्यांना एक वेळेच अन्न भेटत नाही, ते तिथे रेस्टाॅरंट जवळ येतात, बघतात. कुणी आपल्याला अन्न देईल म्हणून बघत असतात. पण सर्वच लोकांच लक्ष जात अस नाही ग, तुला तर माहिती आहे लोक कितीतरी तिथे येतात. ताटातल अन्न सोडून जातात, वायाला जात असेल पण देत नाही. कधी कुणाला दया आली तर लहान मुलांना देतात. कधी तर तर हुसकावून देतात. " हे सगळ भुकेसाठी करतात. कुणी काही दिल तर एकवेळेच तरी भागेल. पोटाची भुक भागवता येईल." " हो आई तुम्ही बोलता ते अगदी खर आहे."
सई नेहमीच अस करायची. म्हणून एकदा आजी आणि आईने सई आणि अजयला त्याच रेस्टारंटमध्ये जेवायला नेल.ते जेवण करून बाहेर आले असतील तेव्हा दोन लहान बहीण भाऊ अन्नासाठी लोक देतील या आशेने बघत होती. येणार्या जाणार्याला भुक लागली काहीतरी द्या अस सांगत होती. हे सईने जेव्हा स्वतःच्या डोळ्याने बघीतल तेव्हा तिच्या डोळ्यांत पाणी आल. तिने आईला त्यांना खाण्यासाठी आपण देऊया सांगितल. आईने त्या दोन मुलांना तिथुन जेवण द्यायला लावून पैसे दिले. घरी आल्यानंतर त्या प्रसंगानंतर सई शांत झाली. आजीने तिला जवळ घेतल नि सांगितल... सई बाळा बघितल ना आज ती दोन लहान मुले अन्नासाठी वणवण फिरत होती. लोकांना मागत होती. " " हो ग आजी, साॅरी मी आईला आणि तुला भाजी कींवा जेवणावरून ते आवडत नाही म्हणून खूप वेळा बोलले. खरच साॅरी. " बाळा तुला समजल यातच सगळ आल." आजी दोन्ही मुलांना सांगत होत्या. " आपल्या जेवणाला नाव ठेवायला, फेकायला एक मिनीट लागतो. पण तेच अन्न शेतकर्याला पिकवायला काही महीने लागतात. तो कष्ट करतो, राबतो तेव्हा ते अन्न आपल्या पर्यंत येत. तेच अन्न शिजवणारी आपली आई कीतीतरी वेळ कीचनमध्ये उभी असते. आपल्या घरच्यांना, मुलांना चांगल अन्न मिळाव, त्यांच आरोग्य छान राहाव ही काळजी ती घेत असते." " अन्न हे पूर्ण ब्रम्ह " आयुष्यात अन्नाचा कण कधी वाया जावू देऊ नये. खावून तृप्त व्हावे फेकून. तुम्ही थोडस आवडल नाही की टाकून देता... " तस नाही करायच.
शेतकरी अपल्याला अन्न मिळालंव म्हणून ऊन पावसाची पर्वा न करता शेतात राबतात. तेव्हा ते अन्न आपल्याला ताटापर्यंत पोहचत. निताही मुलांना सांगत होती... " अन्न वायाला घालवू नये बाळांनो, आपल्या घरी कींवा कुठेही गेलो तरी जेवताना आपल्याला जेवढ लागत तेवढच ताटात घ्यायच. जेणेकरून अन्न वायाला जाणार नाही. मुले मन लावून ऐकत होती. सई म्हटली आई , आता कोरोनाच्या काळातही लोकांना अन्नदान केल जात होत ना..." हो मुलांनो, कोरोनाच्या काळात कितीतरी हातावर पोट असणार्यांचे रोजगार गेले. त्यांना दोन वेळच्या जेवणाची आभाळ होत होते. तेव्हा बर्याचश्या लोकांनी अश्या लोकांकरता अन्नदान केल. भुक ही फार वाईट असते. दोन वेळेच्या जेवणासाठी माणसाला कष्ट करावे लागतात. अन्नाची कीॅमत त्यांना विचारा, ज्यांना दोन वेळेच अन्नही मिळत नाही. गरीबांना तर दोन वेळच पोटाची खळगी भरायची काळजी असते. " खाण्यासाठी प्रत्येकाने जगाव पण पोट भरल्यानंतर ज्यांना अन्न भेटत नाही त्यांच्यासाठी अन्न वायाला घालवण्यापेक्षा अन्नदान नक्की कराव "
आईने आणि आजीने सांगितलेल दोन्ही मुलांना पटल होत. सईही म्हटली की मला पटलय, साॅरी मम्मा, मी चुकले. पण यापुढे तु देशील ताटात ते मी आवडीने खाईल आणि हो आवडत नाही म्हणून किॅवा जास्तीच घेऊन अन्न वायाला घालवणार नाही. " आपल्या दिदीच बोलण ऐकून अजयही म्हणाला... मी पण अस करणार नाही. दोन्हीही मुल आजीला जाउन बिलगली... तेव्हा निताने म्हटल चला, " आपला सर्वांचा छानसा सेल्फी घेऊयात " सई आणि अजय त्यादिवसापासुन कधीही अन्नाला नाव ठेवत नव्हते. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना भुके साठी, पोटासाठी भीक मागावी लागते. अन्न मिळत नाही. म्हणून अन्न वाया घालवू नका, एका घासाची किंमत भुकेली व्यक्ती सांगु शकते. " अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे " अन्न वाचवा भुकेल्याल्यांना खाऊ घाला.