Anjum Shaikh

Children Stories

3.7  

Anjum Shaikh

Children Stories

बालकथा (मूक प्रेम)

बालकथा (मूक प्रेम)

2 mins
903


मधु मावशी सत्तरच्या वयातील असेल. घरी तिच्या असे कोणीच नव्हते. गावाबाहेर तिची झोपडी होती. ती जंगलातून लाकडे गोळा करायची. बाजारात विकायची. तिने एक लहानशी फुलबाग तयार केली होती, आपल्या झोपडीपाशी. त्यातील फुले तोडून हार बनवायची व मंदिरापाशी बसून विकायची. मिळालेल्या पैशाने ती थोडं धान्य, भाजी विकत घ्यायची व आपला गुजारा करायची. ती मूठभर धान्य कबुतरांना द्यायची. कधी एखादी भाकर गाईला द्यायची. आपल्या झोपडी पाशी कोणी आलं तर ती त्यांना उपाशी पाठवत नसे.


एकदा तिच्या झोपडी पाशी एक कुत्र्याचं पिल्लू आलं. ते जखमी होतं. थंडीने कुडकुडत होत व उपाशी ही होतं. आजीने पिल्लूला उचललं त्याच्या अंगावरून मायेचा हात फिरवला. त्याची जखम धुवून काढली जखमेवर कशाची तरी पानं वाटून लावली व झोपडीबाहेर एका गोंट्यात त्याला अंथरूण करून दिलं. पिल्लाला ती रोज थोडीशी भाकर पाण्यात भिजवून देई. त्याची काळजी घेई. हळू ते पिल्लू बरं झालं. आता ते इकडेच राहू लागले. दिवसभर ते गावात हिंडायचे, पण रात्री मात्र झोपायला आजीच्या झोपडीपाशी यायचे. सकाळ झाली की आजीचे झोपडी पाशी एकच किलबिलाट असायचा. चिमण्यां, कबुतरं, मांजर, कुत्र असे सगळे असायचे. आजी सर्वांना थोडं थोडं काहीतरी खायला द्यायची मगच ते निघून जायची.


एक दिवस आजी आजारी पडली. पण तिची सेवा करायला कोणीच नव्हते‌. तिच्या झोपडी पाशी सर्व प्राण्यांच्या ये-जा होत्याच. पण तिची सेवा कोण करणार? दोन दिवस आजी झोपडीबाहेर निघालीच नाही. त्यामुळे जनावरांना तिने खायला दिलेच नाही. ती जनावरे लुडबुड करायची आणि निघून जायची. पण आता मात्र त्यांच्या ध्यानात आलं की आजीला काहीतरी झालं आहे. कुत्रं झोपडीच्या आत गेलं. त्याने बघितलं, आजी अंथरुणावर कह्णत पडली होती. त्याच्या लक्षात आल की आजी आजारी आहे. तो धावत धावत गावात वैद्याच्या घरी गेला. त्याने वैद्या वर खुप भुंकले. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की आजी आजारी आहे, पण त्या वैद्याला काहीच समजत नव्हते. तो कुत्र्याला तिकडं हाकलत होता. मग कुत्र्याने वैद्याची पिशवी तोंडात धरली व पळू लागला. त्याच्या मागे वैद्यही धावू लागला. आता तो वैद्याला आजीच्या झोपडी पाशी घेऊन आला. कुत्रं पिशवी घेऊन आजीच्या झोपडीत गेला. वैद्यही त्याच्यामागे गेला. त्याने बघितलं, अंथरुणावर आजी कह्णत पडली आहे व आजूबाजूला सर्व जनावरं बसली होती. त्याने आजीला हाक मारली. त्याने विचारलं, 'तुम्हाला काय झाले आहे'. 'मी आजारी आहे. तुम्हाला बोलविण्यासाठी इथं कोणीच नाही.' वैद्याने आजीची तपासणी केली व औषधं दिली. त्यांनी सांगितले, 'तुम्ही असं म्हणू नका की तुमचं कोणीच नाही. आज ह्या मुक्या जनावरांनी तुमचे प्राण वाचवले.' मुक्या जनावरांनी न बोलताच आजी ची सेवा केली. जोपर्यंत आजी बरी होत नाही, तोपर्यंत ती तिथंच राहायची. थोड्या दिवसांनी आजी बरी झाली. ती अंगणात आली व सर्व प्राण्यांना आपल्या जवळ जाऊन बसली. आता आजी खूपच भाऊक झाली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.


आपण केलेले प्रेम हे जर खरे असेल, तर ते मुक्या प्राण्यांनाही कळते. त्यांना भाषेची गरज नाही.


Rate this content
Log in