सई
सई


मी घरी असताना मला सईला शाळा सुटल्यावर घरी आणायला जाणे हा माझा आवडता कार्यक्रम असतो ... या कार्यक्रमला १५ मिनिट नेहमी मी उशीराच जाते ..अगदी जाणूनबुजून उशिरा जाते. मला सईला मैत्रिणींमध्ये रमलेली बघायला खूप आवडते. काही तरी खास गप्पाटप्पा चालल्या असतात. कधी उगाच सगळी पुस्तक वह्या बाहेर काढून मोठा अभ्यासाचा पसारा मांडला असतो .. कधी तरी शाळेत खूप चालणारा टाळ्याचा खेळ चालला असतो .. गमंत वाटते मोठी हे सगळा बघायला आणि सगळ्याच शाळेतल्या मुलीन मध्ये असे टाळ्याचे खेळ पिढी सोबत पुढे पुढे सरकतात ते कसे काय बरं? असा प्रश्नही मनाला पडून जातो .. कदाचित एखादी आई घरी सांगत असेल लेकीला तिच्यावेळची शाळा आणि शाळेतल्या गमती जमती..
हल्ली एकदा तर सई च्या मैत्रिणी तिच्या सोबत धावत माझ्या कडे आल्या... अगदी गपचूप बाईची नजर चुकवत आल्या होत्या. त्या दोघी पैकी एकीने वेगळ्या फिल्मी स्टईलने माझ्याशी हात मिळावला आणि गोड गोड हसली.. दुसरी एकजण त्यानंतर तिच्या दप्तरातून sanitiser काढून त्याचे इटूकले थेंब माझ्या हातावर देऊन खुदकन हसली .. काय गंमत वाटते त्यांना, हे मला तेव्हा नेमक कळलं नाही, सईला मग बाहेर आले कि लगेच मी विचारला सई अस का ग केल त्यांनी ? मग ती चेहरा अगदी खास ठेवणीतल करून सांगते ..अग त्यांना तू खूप आवडते..म्हणून त्या तुला भेटायला आल्या होत्या!! किती वेगळी भेट.. आणि हात मिळावला म्हणून वर sanitiser चे थेंब .. ठी.व्ही. वरची जाहिरातबाजी पोरींवर फारच परिणाम करून गेली होती .. मनात हसायला आल .. काही तरी नवीन अनुभवल. खूप सालस स्पर्श होते ते. कोणताही हेतू नसलेले आणि मनापासून केले वागण .. आवडल खूप! बरं हे sanitiser पण खूप खास बात आहे म्हणे " ज्या खूप बेस्ट फ्रेंड असतात ना त्यांनाच फक्त ते दिला जातं....." हे गुपित सईनी घरी आल्यावर सांगितलं .. खूप मोठ गुपित असल्याच्या अविर्भावात!
एकदा शाळेतून येताना सईचा एक वेगळाच प्रश्न अचानक आला ..असे ती खूप प्रश्न विचारते उत्तर अवघड असलेले.. हा प्रश्न पण तसाच होता .." आई कुणाच्या दारातल्या झाडावरची फुले तोडली तर ती चोरी होते का ग? " आता याच उत्तर खोट द्यावं तर तीच तिची कायमची समजूत होणार.. उत्तर साठी मलाही मग विचार करावा लागला.
खरच प्रश्न मोठा निरागस वाटत असला तरी विचारात टाकणारा नक्कीच आहे... खरच अशी फुलांची चोरी होईल का? फुलं तर निसर्गाचं देणं आहे .. ज्या जमिनीत झाडाने मुळ रोवून उभं रहाव ती जमीनही त्याचीच आहे .. अशी फुललेली फुल देवा चरणी वाहिली गेली तर त्या फुलांचच जीवन सार्थकी लागत.. जणू निसर्गाचं देण निसर्गालाच अर्पण केल्या सारखं आहे .. आणि त्या साठीच न विचारता फुले काढली तर ती खरच चोरी ठरेल का? की जागेचा मालक मालकी हक्क गाजवेल आणि मग फुलं चोरली म्हणेल ... तो दाखवेल का मनाचा मोठेपण की त्याला फुलाचा देखावा दारी हवा..देव्हारात नको! शोभेची फुल देवा चरणी जात नाही ..त्यांना बोचत असेल का ही खंत.. इतकं फुलूनही देवाशी साधी जवळीच तर नाहीच तर साधे चरण स्पर्शही नाही.. फुलून यावं आणि अर्पण व्हावं या सारखं दुसरे जीवनाचे सार्थक फुलांना असेल का? फुलाने सुगंधाने.. मोहक रूपाने माणसाच्या मनाला आनंद द्यावा हेही काही कमी लेखता येत नाही.. पण अर्पणाचा आनंद वेगळाच ठरतो .. मग ती फुलं असो किंवा माणसाच आयुष्य असो; जिथे समर्पण तिथेच आनंद!
सईला मात्र इतकाच सांगता आल " नाही होत अशी फुलाची चोरी .. फक्त ती फुला देवा चरणी अर्पण करायला काढली असावीत .. मग नाही होणार चोरी...