Prachi Mulik

Romance Fantasy

1.1  

Prachi Mulik

Romance Fantasy

सखी !!

सखी !!

3 mins
2.6K


मनाचा विरंगुळा हवा तर पुस्तक वाचण्या सारखे दुसरे सुख नाही... कोणाची तक्रार नाही की कुणाला काही सांगणं नाही.. कुणाचा हुंकार ही नाही.. आणि लेखक जर मनासारखा असेल तर मग पुस्तकातील एक एक अक्षर डोळे टिपून घेऊन मनात रुजवतात.. वाक्य परत परत वाचली जातात... का? मनाला पटली म्हणून...! खूप दिवसांनी लायब्ररीत जायचा योग आला... ठरवलं वपुंची सगळी पुस्तकं वाचून काढायची... वाचनालयातल वातावरण पुष्कळस मोकळं होत... महिला कर्मचारीवर्गाची नेमणूक हे त्याला विशेष कारण असावं.. सगळी माहिती अगदी तत्परतेने दिली गेली.. पावती हरवली तर advance कसं परत मिळणार नाही हे मनावर दोन वेळा सांगून बिंबवल गेलं... मी पण त्याच क्षणी पावती कपाटात कुठे ठेवायची हे ठरवलं... इतर सगळे सोपस्कार होईपर्यंत पुस्तक निवडा असं अगत्याने सांगितल गेलं .. मी वपुंची पुस्तक सांगताच त्या महिलांपैकी एक पुस्तकांच्या त्या गाभाऱ्यात शिरली..काही जणी वर्तमान पत्र वाचून ठळक बातम्या बाकीच्यांना ठळकपणे न मागता देत होत्या.. मनात सहज विचार आला.. किती छान.. भवती अफाट पुस्तक... लाखमोलाचे लेखक..विचार प्रगल्भ करणारे लेख.. वाचन करू तितके कमीच.. इतक्यात माझ्या समोर वपू च्या पुस्तकांची चळत ठेवली गेली.. आणि हवं ते पुस्तक घेऊन तशीच परत दया अस सांगितल गेलं... हा पण शिस्तीचा शिरस्ता केवळ महिलांमुळे शक्य झालेला...मी त्यापैकी पुस्तकातून सखी निवडलं.. पुस्तक चाळताना....लसुण 10 रूपये किलो झाली.. अशी लसणी इतकीच झणझणीत आवाजात ठळक बातमी वर्तमान पत्रातून बाहेर आली.... पुस्तकांच्या त्या विशाल जगात या सख्यांना लसणीच्या दराची बातमी सुखावणारी होती... मला मनापासून हसायला आल.. संसारात गुंतलेली सखी पुन्हा छान वाटली...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance